मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
पुसदमध्ये कौतुकाची लाटपुसद : रमजानच्या पवित्र महिन्यात लहान मुलांनी उपवास ठेवल्याचे एक प्रेरणादायी उदाहरण समोर आले आहे. पुसद येथील शेख महेबूब उर्फ बाबू भाई, पत्रकार यांचे नातू अब्दुल कबीर शेख (वय ८) आणि नात कहेकशा जमन शेख अतिक (वय ७) यांनी इतक्या लहान वयात उपवास पूर्ण करून सर्वांची मने जिंकली आहेत.एवढ्या लहान वयात दिवसभर उपवास करणे सोपे नसते. मात्र दोन्ही चिमुकल्यांनी मोठ्या उत्साहाने आणि श्रद्धेने आपला पहिला उपवास पूर्ण केला. कुटुंबीयांनी सांगितले की, रमजानबद्दल त्यांना विशेष आकर्षण असून त्यांनी स्वेच्छेने उपवास करण्याचा निर्धार व्यक्त केला होता.इफ्तारच्या वेळी कुटुंबीयांनी आणि परिसरातील नागरिकांनी मुलांचे कौतुक केले. त्यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद देत त्यांच्या या प्रयत्नाचे अभिनंदन करण्यात आले.शेख महेबूब उर्फ बाबू भाई यांनी सांगितले की, “इतक्या लहान वयात मुलांनी दाखवलेली श्रद्धा आणि संयम ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.”रमजानच्या या पवित्र महिन्यात या चिमुकल्यांची समर्पण भावना आणि धार्मिक आस्था परिसरात चर्चेचा विषय ठरली असून अनेकांकडून त्यांचे कौतुक होत आहे.

























