मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
स्व.रामाजी चन्नावार विद्यालय सिंघानिया नगर, गजानन सोसायटी यवतमाळ येथील कार्यरत स.शिक्षक प्रसिद्ध नाट्य कर्मी अशोक नारायण आष्टीकर यांचे शिष्य अमित श्रीराम राऊत, यवतमाळ अस्मिता रंगायतन नाट्य संस्था मध्ये 20 वर्षा चा अभिनयचा अनुभव असलेले व काजू मराठी चित्रपटातील मुख्य भूमिकेमुळे महाराष्ट्र राज्यात प्रसिद्ध झालेले अभिनेते तसेच यवतमाळ रत्न पुरस्कार प्राप्त, महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत दोन रौप्य पदक प्राप्त अमित राऊत यांना 2026 मानाचा अंतराष्ट्रीय दादा साहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार त्यांना 19 फेब्रुवारी 2026 पिंपरी चिंचवड,पुणे येथे खासदार तथा प्रसिद्ध अभिनेते मा.श्री.अमोल कोल्हे यांच्या हस्ते भव्यदिव्य सोहळ्यात प्रदान करण्यात येणार असल्याचे स्वराज्य फिल्मचे राष्ट्रीय सचिव मा.श्री.सुरज सुधाकरराव पवार यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.

























