पुसद प्रतिनिधी अशोक मेटकर
यवतमाळ जिल्हात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, शस्त्र बाळगणा-या तसेच अउघड गुन्हे, आरोपी शोध, अवैध धंदे तसेच गुंगीकारक औषधद्रव्याची तस्करी समुळ उच्चाटन व्हावे याकरीता मा. पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता (भा.पो.से) यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिनस्थ पथकांना गोपनिय माहीती काढून प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सुचना दिल्या आहेत.दिनांक 14/10/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा कडील पथक महागांव पोलीस स्टेशन हददीत पेट्रोलींग करीत असतांना त्यांना गुप्त बातमी मिळाली कि, मौजे पेढी येथील इसम नामे शेख अकील शेख मिरांजी हा त्याचे चारचाकी वाहनांतून गौवंश मांसची वाहतुक करीत असल्याबाबत माहीती मिळाल्याने नमूद पथकांने पेढी-पोखरी रोडवर सापळा रचून सदरचे वाहन क्रमांक एम एच 05 ऐजे 6521 थांबवून चेक केले असता त्यामध्ये 110 किलो गोवंश मांस प्रतिकिलो 240 प्रमाणे असा एकूण 26,400/- व सदर वाहन किंमत रु 1,00,000/- रु असा एकूण 1,26,400/- रु मुददेमाल बाबत पशू वैदयकिय अधिकारी यांना अभिप्राय घेवून त्याप्रमाणे पंचनामा करुन ताब्यात घेवून इसम नामे शेख अकील शेख मिरांजी वय 43 वर्ष, रा. पेढी ता. महागांव जि. यवतमाळ यांच्या विरुध्द पोलीस स्टेशन महागांव येथे गुन्हा दाखल केला आहे.सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. कुमार चिंता (भा.पो.से) सा, मा.अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. पियुष जगताप (म.पो.से) सा तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. हनुमंत गायकवाड, सा, मा. पोलीस निरीक्षक श्री. सतीश चवरे, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, यांचे मार्गदर्शनात सपोनि/धिरज बांडे, पोउपनि/शरद लोहकरे, पोहवा/संतोष भोरगे, सफौ/मुन्ना आडे, पोहवा तेजाब रणखांब, पोहवा सुभाष जाधव, पोहवा/ कुणाल मुंडोकार, पोहवा/रमेश राठोड, पोशि/सुनिल पंडागळे, चापोउपनि रविंद्र श्रीरामे, पोशि/राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे. 2 of 2

 
                                                                                                
							










 
			   
			   
			   
			   
			   
			   
			   
			   
			  














