मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
शाहिद बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधून भारत सरकारने देशात आदी कर्मयोगी अभियान चालू केले आहे त्याचाच एक भाग म्हणून मौजे ग्रामपंचायत दहिवड बु अंतर्गत मौजे पाळूवाडी येथे दिनांक 9 नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेण्यात आला या खेड्यात प्रथमच दिनांक 30 सप्टेंबर 1963 रोजी जिल्हा परिषदेची शाळा सुरु झाली तेव्हा पासून आजतागायत 63 वर्षात असंख्य विद्यार्थी घडले शासकीय सेवेत अधिकारी पदाधिकारी कर्मचारी झाले दिनांक 30 सप्टेंबर रोजी या शाळेची मुहुर्त मेढ रोवणारे व अध्यापन देणारे आदी शिक्षक श्री शामराव विश्वनाथ इखार यांनी शिकवलेला पहिल्या चमूतील सहा माजी विद्यार्थानी त्यांचा सत्कार केला त्यामध्ये श्री संभाजी सरकुंडे आय ए एस व राज्य माहिती आयुक्त तसेच श्रीमती गोदावरी वायकुळे श्री रामजी कुरकुटे श्री भीमराव भुरके श्री शेख अहमद श्री फकिरराव भडंगे या सत्तरी ओलांडलेल्या विद्यार्यांनी त्यांचे प्रथम गुरु चा सत्कार केला शाळेचे ऋण फेडण्याचा भाग म्हणून देणग्या दिल्यात संपूर्ण गावाला भोजन दिले ग्रामस्वच्छता कृषी संघटन व एकोपा यावर व्याख्यानाची भाषणे झाली सदर कार्यक्रमाला तालूका गट शिक्षण अधिकारी तालुका अधिकारी विस्तार अधिकारी शिक्षक कर्मचारी वृंद व मोठ्या संख्येने हजर होते गावातील सर्वजण मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमाला हजर होते सदर कार्यक्रमाला बुलढाणा येथून दैनिक भाष्कर वृत्तपत्र चे जिल्हा प्रतिनिधी श्री तिजारे बोराळा ग्रामपंचायती ला निर्मला ग्रामचा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त करून देणारे श्री महाले उत्कृष्ट अध्यापन करून उत्कृष्ट बागायत शेती करणारे अन्त्रीकोळी तालुका चिखली येथील मुख्याधापक श्री प्रदीप अपार यांनी मार्गदर्शन केले तसेच शाळेला भरीव देणगी दिली कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री संभाजी सरकुंडे साहेब होते तर उद्घाटक ईखार गुरुजी सरकुंडे साहेब प्रमुख पाहणे श्री धिरज आडे गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती पुसद श्री मळघणे सेवानिवृत्त अधिकारी आर एफ ओ महाले साहेब ग्रामसेवक बोऱ्हाड खुर्द प्रदीप अपार मुख्याध्यापक विमलबाई रंगराव भडंगे सरपंच दहिवड गट ग्रामपंचायत पाळूवाडी डॉक्टर नामदेव सरकुंडे तालुका वैधकीय अधिकारी हे होते यावेळेस माजी विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले व माजी शिक्षकांचे सुद्धा गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आले या कार्यक्रमाला पत्रकार संघटनेचे पद्धिकारी राजेश ढोले रिपब्लिकन वार्ता विदर्भ उपसंपादक ज्ञानेश्वर मेटकर आवाज सत्याचा न्युज चे मुख्य संपादक सुर्यकांत राठोड जनता लाईव्ह न्युजे मुख्य संपादक सिद्धार्थ कदम दैनिक सुपर भारत प्रतिनिधी पुसद इत्यादी प्रामुख्याने हजर होते




























