मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
ग्रामीण जीवनाची जीवनवाहिनी अधिक बळकट करण्यासाठी जिल्ह्यातील 9 डेपोला प्रत्येकी 10 प्रमाणे 90 नवीन बसेस उपलब्ध करून द्याव्या यासाठी परिवहन मंत्र्यांकडे मी सातत्याने पाठपुरावा केला होता, त्यामुळे आज पहिल्या टप्प्यात नवीन 10 बसेस उपलब्ध झाल्या आहे. आजही ग्रामीण भागात वाहतूकीचे प्रभावी साधन म्हणून बसकडेच पाहिले जाते, म्हणूनच उर्वरीत बसेस देखील लवकरच आपल्या जिल्ह्याला प्राप्त होणार आहे. आज प्राप्त 10 बसेस पैकी यवतमाळ व उमरखेड या डेपोसाठी प्रत्येकी 5 बसेस देण्यात आल्या आहे.
या लोकार्पण सोहळ्याला यवतमाळ विधानसभा क्षेत्राचे आमदार बाळासाहेब मांगुळकर, आगार प्रमुख छगन दिवसे, यंत्र अभियंता नरसिंग चव्हाण, विभागीय वाहतूक अधिकारी दादाराव दराडे यांच्यासह परिवहन विभागाचे अधिकारी, कर्मचारी व प्रवासी उपस्थित होते.

 
                                                                                                
							











 
			   
			   
			   
			   
			   
			   
			   
			  
















