मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
पुसदः ज्ञानोपासक शिक्षणप्रसारक मंडळ फुलवाडी द्वारा संचलित स्व. आप्पासाहेब अत्रे विजाभज माध्यमिक आश्रम शाळा फुलवाडी ता.पुसद जि. यवतमाळ या शाळेचा फेब्रुवारी मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेत मध्ये एकूण ४९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.त्यापैकी सर्व विद्यार्थी चांगल्या गुणाने उत्तीर्ण झाले. शाळेचा शंभर टक्के निकाल लागला. या परीक्षेत विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थी १६ तर२२ विद्यार्थी प्रथम श्रेणी मध्ये उत्तीर्ण झाले. शाळेतून प्रथम क्रमांक ईशान राजेश चव्हाण, द्वितीय धनश्री अशोक चव्हाण तर तृतीय साक्षी राजेश कुकडे यांनी मिळविला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दीपक चव्हाण व सस्थेचे सचिव राजेंद्र चव्हाण, शाळेचे मुख्याध्यापक गजानन कलिंदर यांनी केले व पुढील शिक्षणासाठी शुभेछा दिल्या. सर्व पालकांनी व विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी यशाची परंपरा कायम राखली.
