मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
पुसद : मागील ५ वर्षांपासून इसापूर धरणावर हंगामामध्य मच्छीमारी साठी येत असलेल उत्तर प्रदेश मधील ‘बेगुसराय पियासी जि. देवारीया येथील उत्तीम रामायण सहानी (४३) या मच्छीमार कामगाराचा हृदयाघातने मृत्यू झाला. शवविच्छेदन नंतर मृतकाचे शव हजारो किमी दूर नेण्याऐवजी पुसद येथील मोक्षधाम मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. मच्छी ठेकेदार अब्दुल महंमद नासिर खान, विनायक राठोड यांनी पुढाकार घेत स्वतः सर्व जबाबदारी उचलली तसेच मृतकच्या परिवाराला आर्थिक मदत केली. मृतक उत्तीम च्या पश्चात पत्नी, आई, २ मुलं, १ मुलगी, भाऊ व बराच मोठा आप्त परिवार आहे
