मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्त वाहिनीच्या 5 व्या वर्धापन दिनानिमित रोटरी क्लब सभागृह गंजमाळ नाशिक येथे झालेल्या कार्यक्रमात रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र समूहाचे विदर्भ विभाग उपसंपादक राजेश ढोले यांना पत्रकार, व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान व महत्त्वपूर्ण कामगिरी बद्दल व राज्यस्तरीय, महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरवविण्यात आले आहे. सविस्तर वृत्त असे की रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या वतीने महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या नामवंत किर्तीवंत यांना महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार सोहळ्याचे मुख्य आयोजन दिनांक 15 ऑक्टोबर 2025 रोजी रोटरी क्लब सभागृह गंजमाळ नाशिक येथे मुख्य सोहळ्याचे करण्यात आले

होते.दरवर्षी प्रमाणे याही वर्षी पुरस्कार सोहळ्याचे हे पाचवे वर्ष होते हे मात्र विशेष.तसेच वर्तमानपत्राचे प्रतिनिधी व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार प्रतिनिधी यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला.यावेळी प्रमुख उपस्थिती ज्येष्ठ पत्रकार नाशिकचे शशिकांत सोनवणे परिवर्तन कामगार सेनेचे *विशाल भदर्गे वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब शिंदे शिवव्याख्याते *सचिन *देवरे पाटील पुरोगामी पत्रकार संघाचे *शशिकांत पगारे* माजी स्थायी समिती सभापती संजय साबळे सनी भैया रोकडे तसेच समिती नाशिक समिती नियोजन, मुख्य संपादक डॉ. अनिल आठवले कार्यकारी संपादक *सलीम सय्यद व्यवस्थापक सुनील आठवले एडवोकेट खरे रविंद्र कुमार गायकवाड . विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, मराठवाडा उपसंपादक अकबर शहा सलीम सय्यद सुहगणकर फुलंब्री औरंगाबाद नाशिक विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे, एडिटर विभागाचे युवराज हंगेकर इत्यादीसह मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार समारंभ संपन्न झाला.


 
                                                                                                
							










 
			   
			   
			   
			   
			   
			   
			   
			  














