मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
पुसद:दि.12 जानेवारी 2025,पुसद फुलसिंग नाईक महाविद्यालयद्वारा आयोजित राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे एरंडा येथे शिबिर आयोजित करण्यात आले होते यामध्ये बौद्धिक सत्र ठेवण्यात आले त्यात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विषयासाठी पुसद येथिल युवा व्याख्याते व करिअर कौन्सिलर प्रा.सैय्यद सलमान सरांना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. सलमान सरांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा जसे यू.पि.एस.सी,एम.पी.एस.सी तसेच पोलिस भरती,तलाठी भरती सारखे सरळ सेवा भरती विषयी अभ्यासक्रम,परीक्षा रचना,परीक्षा पद्धत या बाबत सखोल असे मार्गदर्शन केले सोबतच मोबाईलचे दुष्परिमाण, सायबर गुन्हे याबाबत सुद्धा विद्यार्थ्यांना जागृत केलं तसेच 5 वर्ष जर कष्ट घेऊन अभ्यास कराल तर पुढील 50 वर्ष सुखी जीवन जगाल असा भविष्याबद्दलचा वेद मंत्र दिला सोबतच अभ्यासाचे नियोजन सुद्धा सांगितले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.अंजली पाम्पटीवार मॅडम होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. सुप्रिया हमजादे, प्रा. जयंत दुधावर,प्रा.संवश जाधव,प्रा. उज्ज्वला राठोड होत्या तर या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक कार्यक्रम अधिकारी वैभग पाटील सर तर सहा.कार्यक्रम अधिकारी प्रा.अनिता राठोड होत्या. कार्यक्रम हा खूपच शिस्त आणि नियोजन पूर्वक पार पडला.विद्यार्थ्यांनी नंतर आलेल्या प्रमुख वक्त्यांना स्पर्धा परीक्षे बद्दल प्रश्न विचारले त्यावर सैय्यद सलमान सरांनी विद्यार्थ्यांचे समाधान केले.आशा प्रकारचे बौद्धिक मार्गदर्शन करण्यात आले.























