जनता न्यूज 24 मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
पुसद तालुक्यालील सतत धडपडणारे सामाजिक कार्यकर्ते, प्रयोगाशिल शेतकरी व माजी जि.प. सदस्य श्री. रामराव चव्हाण यांच्या पुढाकाराने समग्र क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक यांच्या जन्मभूमी असलेल्या पुसद तालुक्यातिल विविध गावांतील प्रयोगशिल व सर्व सामान्य शेतकऱ्यांची नागपूर येथील जैविक शेती व परसबाग निर्मिती अभियानचे प्रमुख वसंत बहार एग्रोटेकचे श्रीपतभाऊ राठोड आणि कुटूंबियांनी वसंतरावजी नाईक यांच्या नावाने थेट इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आरोग्यदायी पर्यावरणपूरक जैविक परसबाग निर्माण केली आहे. जैविकशेती अभियान साठी दिशादर्शी ठरलेल्या परसबागेत अनेक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी भेट देवून समाधान व्यक्त केले आहे. मध्य भारतातील सर्वात मोठे कृषि प्रदर्शन आयोजित करणाऱ्या ऍग्रो व्हिजन द्वारा श्रीपतभाऊ राठोड आणि परिवाराच्या मार्गदशनात गच्चीवरील भाजीपाला लागवड, ही कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न झाली आहे.
नागपूर येथील परसबागेत पुसद तालुक्यातील निवडक शेतकऱ्यांची अभ्यास दौरा व जैविकशेती चर्चासत्र नुकतेच संपन्न झाले.इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील विविध प्रकारच्या भाजीपाला पिकांसोबत फळझाडे,औषधी वनस्पती, कंपोस्ट खत निर्मिती,पक्षांची घरटी,अंडी व प्रत्यक्ष जंगलातील मधमाशा गच्चीवरील बागेत पाहून सर्वजन मंत्रमुग्ध झाले,परसबाग पाहणी व अभ्यास दौऱ्यांदरम्यान वसंत बहार ऍग्रोटेकचे श्रीपतभाऊ राठोड यांच्या कडून जैविकशेती अभियान आणि रोजगार निर्मिती या विषयांवर मोलाचे आणि महत्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले.
पुसद तालुक्यातील सिंगारवाडी, गाजीपुर,पिंपळगाव गावातील शेतकरी रामराव चव्हाण,विनोद चव्हाण,प्रान चव्हाण,रामराव राठोड, अविकाश राठोड चव्हाण,रामश्वेर राठोड,वैजनाथ ढवळे,विष्णू राठोड यांचा प्रामुख्याने सहभाग होता.
या महत्वपूर्ण उपक्रमांसाठी श्री.रामराव चव्हाण यांच्या विशेष पुढाकार आणि परिश्रम होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ.जयश्रीताई राठोड व त्यांच्या दोन्ही मुली दिपाली व अंजली श्रीपतभाऊ राठोड यांनी विशेष परिश्रम घेतले.