मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन ला कोणतीही शासकीय मदत मिळत नाही. त्याचप्रमाणे जीवन ज्योती एड्स प्रतिबंध व प्रबोधन संस्था,पुसद ला सुद्धा कोणतीही शासकीय मदत मिळत नाही. श्रीरामपूर पुसद परिसरातील दात्यांच्या सहकार्यानेच एचआयव्हीग्रस्त रुग्णकारिता ही संस्था मागील मागील पाच वर्षांपासून कार्य करते .देशाच्या उभारणीत एचआयव्हीग्रस्त युवा मागे राहू नयेत,आणी हा आजार पुढे पसरू नये” हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे.संस्थेत सात कार्यकारी सदस्य व सात स्वयंसेवक कर्मचारी पूर्णपणे विनामूल्य सेवा देत आहेत. कार्यकारी मंडळात लक्ष्मीताई पदमे, रमेश फोले, प्रियंका पांढरे, प्राची इंगळे यांचा समावेश असून, वंदना घुमणे व स्वाती गाडे या क्षेत्रीय पातळीवर सक्रिय आहेत. या संस्थेमध्ये सतरा लहान मोठे मुले असून ते आपले शिक्षण घेत आहेत. अशा मुलांना एका महिन्याच्या किराण्याची अत्यंत आवश्यकता होती. संस्था चालकांनी माणुसकीच्या भिंतीकडे तशी मागणी केली असता, माणुसकीच्या भिंतीच्या सदस्यांनी त्यांच्या व्हाट्सअप ग्रुप द्वारे दात्यांना आव्हान केले व त्यांना एका महिन्याच्या किराण्याची व्यवस्था करून दिली. यावेळेस माणुसकीची भिंतचे अध्यक्ष गजानन जाधव यांनी पुसद परिसरातील दानशूर दात्यांना मदतीचे आवाहन केले.व ते म्हणाले की सर्वांनी एक एक महिन्याचा किराणा दिला तर बाराजनातच एका वर्षाचा किराणा व इतर मदत सुद्धा त्यांना होऊ शकते.फक्त गरज आहे समोर येण्याची. व मदत करण्याची. यावेळेस माणुसकीची भिंत अध्यक्ष गजानन दत्तात्रय जाधव संतोष गावंडे, पंजाब ढेकळे ,आनंता चतुर, मधुकर चव्हाण, पंकजपाल महाराज ,मंगेश भगत मिशन ग्रीन अध्यक्ष ,रमेश डंबोळे, पवन बोजेवार दिनकर ठेंगे, मंथन शालिग्राम कदम, प्रकाश येल्हेकर, माया प्रदीप राऊत, रूपाली वाळे, संदीप भाऊरावजी मानकर, सन्नी सुभाष राय, कपिल शामराव पवार, कु. साक्षी क्षीरसागर, किरण किनाके, अनिल हरिदास राठोड, सुरेंद्रसिंह राठोड, बंटी घुरडे, सागर आदिनाथ भागवत, अनिल डुब्बेवार, गौरव गुलाबराव नाईक, सुनील कोमरवल्लीवार ,शार्दुल प्रदीप भोगावकर, अमित हटकर, प्रमोद ठाकूर, नितीन चव्हाण, राहुल गायकवाड, स्वाती भगत, गौरी जाधव, वैष्णवी जाधव,इत्यादी दाते उपस्थित होते….




























