मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
तालुक्यातील इसापुर धरण परिसरात अज्ञात चोरट्यांनी पाण्यात विषारी वनस्पतीजन्य पदार्थ टाकून सुमारे दीड क्विंटल घोडझिंगे मारून चोरी केल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी खंडाळा पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. दि. २६ फेब्रुवारी २०२६ :तालुक्यातील इसापुर धरण परिसरात अज्ञात चोरट्यांनी विषारी वनस्पतीजन्य पदार्थ पाण्यात टाकून मोठ्या प्रमाणात घोडझिंगे (मासे) मारून चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे.धरणावर मागील २५ वर्षांपासून वॉचमन म्हणून कार्यरत असलेले गणपत रामजी काळे (वय ४५, रा. नांनंद यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. २५ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता ते संदीप शिवराम भंगाले, नंदू कुकडे व हर्षद सेजुळे यांच्यासह बोटीद्वारे पेट्रोलिंग करत होते.दि. २६ फेब्रुवारी रोजी पहाटे २ वाजताच्या सुमारास नांनद ते फेट्रा शिवार दरम्यान ३ ते ४ बॅटरीच्या उजेडाचे दिवे दिसले. बोटीचा आवाज ऐकून संबंधितांनी बॅटऱ्या बंद केल्याचा संशय आला घटनास्थळी मोठ्या प्रमाणात घोडझिंगे मृत अवस्थेत आढळले तसेच चिखलात ३ ते ४ अज्ञात व्यक्तींच्या पावलांचे ठसे दिसून आले.प्राथमिक अंदाजानुसार सुमारे दीड क्विंटल घोडझिंगे, किंमत अंदाजे ६० ते ७० हजार रुपये, चोरीस गेले आहेत. अज्ञात चोरट्यांनी जडीबुटी किंवा विषारी पदार्थ टाकून मासे मारले व त्यानंतर त्यांची चोरी केल्याचे तक्रारीत नमूद आहे.या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करून कठोर कारवाईची मागणी करण्यात आली असून खंडाला पोलीस पुढील तपास करीत आहेत. ईसापुर नयनांचे ठेकेदार 20 11 पासून मुंबईचे ठेकेदार मोहम्मद नसीर खान यांचे दीड लाखाचे नुकसान झाले आहे






















