मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
यवतमाळ जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, अवैध शस्त्र, अवैध उत्खन्न सुरु राहणार नाही तसेच अउघड गुन्हे, आरोपी शोध, अवैध धंदयाचे समूळ उच्चाटन व्हावे याकरीता मा. पोलीस अधीक्षक कुमार चिंता सा यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते, त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिस्थान पथकांना गोपनिय माहीती काढून प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सुचना दिल्या आहेत.दिनांक 06/11/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुसद उपविभागात अउघड गुन्हे, आरोपी शोध, पेट्रोलींग करीत असतांना मधुकर नगर येथील इसम नामे-राजू अशोक चांदणे हा स्वतःच्या ताब्यात दहशत निर्माण करण्याकरीता लोखंडी मुठ असलेला सुरा घेवून फिरत तो सार्वजनिक ठिकाणी शांतता व सुव्यवस्था भंग करुन दखलपात्र गुन्हा करण्याची शक्याता आहे अशी मुखबीरव्दारे खात्रीशिर माहीती मिळाल्याने पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी दोन पंचासह मधूकर नगर येथे जावून इसम नामे राजू अशोक चांदणे हा त्याचे घरी ओठयावर मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवून त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या कमरेला एक गोल मुठ असलेला सुरा किंमत 1500/- रु मिळून आल्याने ते जप्त करुन ताब्यात घेवून इसम नामे-राजू अशोक चांदणे वय 40 वर्ष रा. मधुकर नगर पुसद ता. पुसद जि. यवतमाळ यांच्या विरुध्द पोलीस स्टेशन वसंतनगर येथे कलम 4, 25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा करण्यात आलेला आहे.सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. कुमार चिंता सा, मा.अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. अशोक थोरात सा, मा. पोलीस निरीक्षक श्री. सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचे मार्गदर्शनात सपोनि/धिरज बांडे, पोउपनि शरद लोहकरे, स. फौ/मुन्ना आडे, पोहवा/संतोष भोरगे, पोहवा/तेजाब रणखांब, पोहवा सुभाष जाधव, पोहवा कुणाल मुंडोकार, पोहवा रमेश राठोड, पोशि/सुनिल पंडागळे, चा.पो.उप.नि. रविद्र शिरामे, चापोशि/राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.




























