मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
सहसंपादक सिद्धार्थ कदम
पुसद : धम्मनायक सम्राट अशोक, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञापर्व समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून काल टि १2 एप्रिल रोजी प्रो.लक्ष्मण यादव प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून धम्मनायक सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. यशोधरा महिला मंडळ तथागत नगर, व सुजाता महिला मंडळ विटावा वार्ड पुसद यांच्या वतीने बुद्ध वंदना घेण्यात आली.यावेळी अध्यक्ष डॉक्टर राजेश वाढवे म्हणाले की, आपल्या संपूर्ण देशातील राजकीय द्वंद निर्माण झाले आहे समाजामध्ये जे दरी निर्माण झाली आहे. हीच परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे या संपूर्ण विषयाला घेऊन आजचे प्रमुख फक्त बोलणार आहेत आजच्या दिनी मला या ठिकाणी अध्यक्ष स्थान दिले त्याबद्दल मी प्रज्ञा पर्व समितीचे आभार व्यक्त करतो आणि सर्वांना आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.आंबेडकरी परिक्षेतून आजचा भारतीय विषयाला घेऊन आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रोफेसर लक्ष्मण यादव यांनी धमक्रांती प्रज्ञापर्व हे जे शीर्षक देऊन आपण हा कार्यक्रम आयोजित केला तो निश्चितच क्रांतिकारक आहे या जगामध्ये सर्वात पहिले जर कोणी क्रांती केली असेल ते म्हणजे तथागत बुद्ध यांनी आणि त्यांच्या क्रांतीचा मार्ग होता तो म्हणजे प्रज्ञा शील करुणा या मार्गातून जाणारा मार्ग म्हणजे धम्मक्रांती आज संपूर्ण देशा मध्ये आणि राज्य राज्यांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात होणारे शेकडो कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमातून निर्माण होणारी क्रांती रुपी समाजाचे कार्य देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले पाहिजे. महात्मा ज्योतिराव फुले यांनी या देशांमध्ये सर्वात पहिले क्रांती करून महिलांना शिक्षण दिले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जो त्रास झाला त्याच मनुवादी विचारसरणीच्या लोकांनी आजच्या परिस्थितीमध्ये निर्माण झालेल्या चित्रपटाला सेन्सर बोर्डाद्वारे विरोध दर्शविण्यात येत आहे.एकीकडे महाराष्ट्र शासन फुले शाहू आंबेडकरांचे पुस्तक रुपी प्रकाशन करून शासन मान्यता देते आणि त्याच पुस्तकाच्या आधारावर निर्माण झालेला चित्रपट परंतु याच चित्रपटाला मात्र सेंसर बोर्ड विरोध करून महाराष्ट्र शासनाने प्रकाशन केलेल्या प्रकाशन खंडाला एक प्रकारे प्रश्नांकित केल्याचे काम करीत आहेत. 14 वर्ष दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर म्हणून काम केले परंतु विद्यापीठ प्रशासनाला हवे तसे काम होत नव्हते या देशामध्ये ज्या महामानवांनी प्रतिक्रांतीची जी बीजे रोली त्याचाच धागा धरून मी ते नोकरी करत होतो परंतु तेथील व्यवस्थेला मान्य नसल्याने आपण नोकरीचा राजीनामा दिला आणि महापुरुषाच्या विचाराची पेरणी करण्याचे काम आपण अहो रात्र संपूर्ण देशात करत आहोत आणि शेवटच्या श्वासापर्यंत करत राहणार असल्याची प्रतिज्ञा करणार असल्याचेही त्यांनी पुनरुचार केला असे ते शेवटी म्हणाले.यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांना प्रज्ञापर्व समिती 2025 चे ट्रॉफी शील्ड व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मा.प्रो. लक्ष्मण यादव, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. राजेश वाढवे, एडवोकेट आशिष देशमुख, डॉ. अकील मेमन, डॉ. मोहम्मद नदीम, प्रा. विलास भवरे, संजय कांबळे, रंगराव काळे, आत्माराम जाधव, प्रज्ञापर्व समिती २०२५ चे अध्यक्ष मिलिंद जाधव इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे संचालन, आर पी गवई तर आभार सुरेश कांबळे यांनी केले. या कार्यक्रमाला युवक महिला तरुण युवती बाल बालिका तथा धम्म बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
