मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
सहसंपादक सिद्धार्थ कदम
बाबासाहेब आंबेडकर यांनी परंपरेने लादलेल्या विषमतावादी विचारसरणीला नष्ट करून सर्वमानव एकसमान या न्यायाने या देश्याला भारतीय संविधान दिले. त्या संवैधानिक सूत्राने आज साऱ्या देशाला एकत्र बांधले. आजच्या अस्वस्थ वर्तमानात आम्ही एक होणे आवश्यक आहे. एकसंघ बळकट राष्ट्र निर्मितीसाठी डॉ आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानिक विचाराची गरज आहे. त्यांनी दाखविलेल्या वाटेने जाऊन त्यांचे अपूर्ण कार्य पूर्ण करणे हे वैचारिक वारसदार म्हणून आपले कर्तव्य असल्याचे प्रतिपादन प्रख्यात आंबेडकरी विचारवंत प्रोफेसर, डॉ.अनिल काळबांडे यांनी केले. गौळ खुर्द येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सभेत ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. आपल्या भाषणात पुढे बोलतांना ते म्हणाले की, बाबासाहेबांनी सर्व शोषितांना व्यवस्थेच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी सांस्कृतिक लढ्याचे नायकत्व स्वीकारून जातीअंताचा लढा उभा केला. आज देशालाच नव्हे तर विश्वाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची गरज आहे असे ते पुढे म्हणाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आंबेडकरवादी विचारवंत, साहित्यिक सुरेश धनवे यांनी देखील आपले विचार व्यक्त केले. प्रमुख अतिथी म्हणून मारोतराव हराळ, बळीराम राठोड, सरपंच राधाबाई गडदे, पो.पा.पंडित आडतकर हे होते. सुरुवातीला पंचशील ध्वजारोहण व डॉ बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पत्रकार यशवंत जाधव यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.
