मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
सहसंपादक सिद्धार्थ कदम
यवतमाळ जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, अवैध शस्त्र (अग्नीशस्त्र) बाळगणा-या तसेच अ उघड गुन्हे, आरोपी शोध तसेच मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघड करण्याकरीता मा. पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता (भा.पो.से) यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिनस्थ पथकांना गोपनिय माहीती काढून अ उघड गुन्हे उघड करुन आरोपी शोध घेणे बाबत सुचना दिल्या आहेत.दिनांक 04/04/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथक यवतमाळ कॅम्प पुसद हे मोटार सायकल चोरी तसेच अ उघड गुन्हे मधील आरोपी शोध व माहीती काढत असतांना गुप्त बातमीदाराव्दारे माहीती मिळाली कि, फुकटनगर महागांव येथील गाब्या ऊर्फ संजय रंगराव गायकवाड यांच्याकडे काळया रंगाची Hero Splendar + मोटार सायकल असून ती संशयीत आहे अशी गोपनिय माहीती मिळाल्याने सदर ठिकाणी जावून गाब्या ऊर्फ संजय रंगराव गायकवाड यास ताब्यात घेवून त्याचे ताब्यातील मोटार सायकल चे कागदपत्राची मागणी केली असता कागदपत्र नसल्याचे सांगून सदरची मोटार सायकल त्याने व त्याचे साथीदार पिन्या ऊर्फ रवि भरवाडे, कुलदिप किसनराव बनसोडे असे मिळून मौजे मोहा ता. पुसद येथील यात्रेमधून चोरी करुन आणल्याचे सांगितल्याने त्याबाबत खात्री केली असता. काळया रंगाची Hero Splendar +मोटार सायकल त्याचा चेचीस क्रमांक MBLHAR076HHM73349 इंजिन नंबर HA10AGHHM16963 असा किंमत 60,000/- रु ती पुसद शहर पोलीस स्टेशन अप क्रमांक 106/2025 कलम 303(2) भान्यासं या गुन्हयातील चोरीची असल्याची खात्री झाल्याने इसम नामे 1) गाब्या ऊर्फ संजय रंगराव गायकवाड वय 28 वर्ष 2) कुलदिप किसनराव बनसोडे वय 32 वर्ष, दोन्ही रा. महागांव ता. महागांव जि. यवतमाळ यांना ताब्यात घेवून आरोपी क्रमांक 3) पिन्या ऊर्फ रवि भरवाडे यांचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही.पुसद शहर अप क्रमांक 106/2025 कलम 303(2) भान्यासं या गुन्हयातील इसम नामे 1) गाब्या ऊर्फ संजय रंगराव गायकवाड वय 28 वर्ष 2) कुलदिप किसनराव बनसोडे वय 32 वर्ष, दोन्ही रा.महागांव ता. महागांव जि. यवतमाळ यांना व गुन्हयातील मोटार सायकल पुढील तपास कामी पोलीस स्टेशन पुसद शहर यांच्या ताब्यात दिले.सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. कुमार चिंता सा, मा. अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. पियुष जगताप सा, मा. सहा पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. हर्षवर्धन बी.जे. सा, मा. पोलीस निरीक्षक श्री. सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचे मार्गदर्शनात सहा. पोलीस निरीक्षक गजानन गजभारे, पोउपनि/शरद लोहकरे, चापोउपनि रविंद्र शिरामे, पोहवा/संतोष भोरगे, पोहवा/तेजाब रणखांब, पोहवा/सुभाष जाधव, पोहवा/रमेश राठोड, पोहवा/कुणाल मुंडोकार, पोशि/सुनिल पंडागळे, चापोकॉ राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
