मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
दिनांक ३०/१०/२०२५ रोजी पोहवा/६९८ सुनिल मदने, पोहवा /२१७७ शंकर ताळीकुटे, पो.अ.४४ जुनेद सैयद यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली की, पोलीस स्टेशन-पुसद ग्रामीण हद्दीमध्ये ग्राम चिखली येथिल शेत शिवारात एका शेतकरी याने मानवी मेंदुवर विपरीत परीणाम करणारा प्रतिबंधित गांजा सदृश्य अमली पदार्थ वनस्पती लागवड केली असुन सदर शेतमालक हे गांजा पिकाची स्वतः राखन करीत असतो अशी माहीती मिळाल्याने आम्ही, प्रभारी अधिकारी पो.स्टे. पुसद ग्रामीण सपोनि / सुरेंद्र राउत यांना व आमचे अधिनस्त पथकाला कार्यवाही करणे करीता पाठविण्यात आले.सपोनि/सुरेंद्र राउत व आमचे अधिनस्त पथकाने ग्राम चिखली येथिल शेतशिवारातील चिंतामण हरीभाउ डाखोरे वय ६५ वर्ष, रा. चिखली यांचे शेतात छापा कारवाई केली असता त्यांचे शेतात एकुण वजन ८४ किलो ९०० ग्रॅम प्रती १५,०००/- रु प्रमाणे असा ऐकुण १२,७३,५००/- रुपये किंमतीचा मानवी मेंदुवर विपरीत परीणाम करणारा प्रतिबंधित गांजा मुददेमाल शेतात मिळुन आल्याने जप्त करण्यात आला. सदर प्रकरणी पो.स्टे. पुसद ग्रामीण येथे NDPS Act प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात येवुन आरोपी चिंतामण हरीभाउ डाखोरे वय ६५ वर्ष, रा. चिखली ता पुसद जि. यवतमाळ यास अटक करण्यात आली आहे.सदर गांजा रेड कारवाई श्री. कुमार चिंता, मा. पोलीस अधीक्षक, यवतमाळ, श्री. अशोक थोरात, मा. अपर पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांचे मार्गदर्शनानुसार आमचे आदेशान्वये सपोनि /सुरेंद्र राउत, प्रभारी अधिकारी पो.स्टे. पुसद ग्रामीण, पोउपनि/राहुल देशमुख, आमचे अधिनस्त पोहवा /६९८ सुनिल मदने, पोहवा /२१७७ शंकर टाळीकुटे पोहवा/रविंद्र गावंडे, पोहवा/विनायक चव्हाण, पोहवा / सचिन बंकेवार, पोअं/मो.ताज, संताष राठेड, शोएव शेख, सर्व पो.स्टे. पुसद ग्रामीण पो.अं ४४ जुनेद सैयद पो.अं ४७८ जुबेर सैयद यांनी केली आहे.अशाप्रकारे कुणीही इसम अवैद्यरित्या गांजा किंवा इतर मादक पदार्थ विकी, वाहतूक किंवा स्वतः चे शेतात लागवड करीत असल्यास नागरीकांनी निर्भय होउन उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पुसद येथे माहिती कळवावी. माहिती कळविणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे याद्वारे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.






























