मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
सहसंपादक सिद्धार्थ कदमपुसद,
दिनांक:27/03/2025 समाजामध्ये बंधुभाव,सद्भावना, राष्ट्रीय एकात्मता निर्माण होण्याच्या दृष्टीने जमाते इस्लामी हिंद पुसद तर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष दिगंबर जगताप सरांनी त्यांच्या शिक्षक पत संस्थेची जागा इफ्तार पार्टीच्या कार्यक्रमाला दिली. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते जळगांवचे प्रा.सोहेल आमिर शेख होते तर प्रमुख पाहूणे श्री दिगंबर जगताप सर विभागीय अध्यक्ष मराठा सेवा संघ, श्री. संतोष सुरवाडे सर राज्य प्रशिक्षक बामसेफ,श्री. मिलिंद जाधव अध्यक्ष प्रज्ञा पर्व समिती, सुधीर देशमुख,संभाजी ब्रिगेड, श्री. पंकजपाल महाराज, कीर्तनकार, प्रबोधनकार उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात नुरुल्लाह खान सरांच्या पवित्र कुरआन पठाणाने झाली तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेख नईम सरांनी केले सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालक सैय्यद सलमान सरांनी केले. प्रमुख वक्ते सोहेल आमिर सरांनी आपल्या मुख्य भाषणात पवित्र रमजान आणि सद्भावना याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले तसेच आजच्या काळात मानवता व सद्भावना किती आवश्यक आहे यावर संबोधन केले. या कार्यक्रमात इफ्तार सर्व बांधवांसोबत करण्यात आले. कार्यक्रमात 120 पेक्षा अधिक विविध संघटनेचे मराठी देश बांधव उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व देश बांधवांचे जमाते इस्लामी हिंद पुसद चे शहर अध्यक्ष मिर्झा नवेद बेग यांनी आभार व्यक्त केले.अश्या प्रकारचे सद्भावना प्रिय कार्यक्रम नेहमी होत राहावे अशी भावना आलेल्या सर्व बांधवांनी व्यक्त केली.आशा प्रकारे इफ्तार पार्टीचा कार्यक्रम सलोख्यात पार पडला.
