मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
पुसद – संत सेवालाल महाराज बंजारा लमाण तांडा समृद्ध योजना अंतर्गत पुसद तालुक्यातील लोहरा ई , पारवा बु मोहा ई या गट ग्रामपंचायतचे विभाजन करून पाच नविन ग्रामपंचायतेची स्थापना करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत राज्यमंत्री तथा आमदार इंद्रनिल नाईक यांनी पाठपुरावा केला या निर्णयामुळे लोहरा ई ग्रामपंचायतीचे विभाजन होणार तर लोहरा खुर्द नावाची नविन ग्रामपंचायत स्थापन करण्यात आली आहे पारवा बु. ग्रामपंचायतीचे विभाजन होऊन पारवा खुर्द ही स्वतंत्र ग्रामपंचायत म्हणून मान्यता देण्यात आली आहे तर मोहा ई. ग्रामपंचायत चे विभाजन करून मोहा ई नंदपूर रामनगर आणि शिवा नगर या गावांचा समावेश असलेली नविन ग्रामपंचायत अस्तित्वात आली आहे या निर्णयामुळे स्थानिक प्रशासन अधिक सक्षम होईल ग्रामिण विकासाला वेग मिळेल तसेच तांडा व ग्रामिण वस्तीतील जनतेच्या मूलभूत गरजांवर थेट लक्ष केंद्रित करणे शक्य होणार आहे स्थानिक नागरिक आणि ग्रामस्यामध्ये या निर्णयाचे स्वागत होत असून विकासाच्या नव्या पर्वाला सुरवात होईलसंत सेवालाल महाराज बंजारा लमाण तांडा समृद्ध योजनेच्या माध्यमातून तांड्याचा सर्वांगिण विकास साधण्याचा आमचा प्रयत्न आहे नविन ग्रामपंचायतीमुळे स्थानिक पातळीवर लोकप्रतिनिधी ना अधिक अधिकार मिळून विकासकामांना चालना मिळेल- इंद्रनिल नाईक- राज्यमंत्री (महाराष्ट्र राज्य )



























