मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
पोलिस स्टेशन पुसद शहर अंतर्गत येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक पुसद येथिल एम. के मेडिकल समोर उभी असलेली हिरो कं नीची HF DELX MH-29-BU-0410 मोटर सायकल चोरी गेल्याची फिर्याद नामे मोहम्मद अकील मोहम्मद ईक्बाल रा. वसंतनगर पुसद यांनी पो.स्टे ला दिल्या वरून कलम ३०३ (२) B.N.S अन्वये गुन्हा नोंद झाला होता. गुन्हयासंबधाने शहरात वाढलेल्या मोटर सायकल चोरी करण्या-या गुन्हेगारांना पकडुन मोटर सायकलचा शोध घेणेकरीता पोलीस उप विभागाचे पोलीस अधिकरी IPS हर्षवर्धन बि. जे साहेब व पोलीस स्टेशन चे ठाणेदार यांनी डि.बि पथकाचे प्रमुख सपोनि निलेश देशमुख यांना आदेशीत केले त्यावरून डि.बी पथकाने गोपनिय बातमीदार मार्फत व तांत्रिक कौशल्य वापरून आरोपी निषपन्न करून आरोपी रामसिंह भैरोसिंह भाटिया वय २७ वर्ष रा. जोधपुर र जस्थान ह.मु मांगुळ ता.जि यवतमाळ यास अटक करून जोधपुर राजस्थान येथुन गुन्हयातील मोटर सायकल प्राप्त करून जप्त करण्यात आली आहे. पुढील तपास डि. बी पथक करीत आहे.सदरची कार्यवाही वरिष्टांच्या व उप विभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बि. जे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार उमेश बेसरकर यांचे सुचन प्रमाणे स.पो.नि निलेश देशमुख, पो.हवा मनोज कदम, म. पोना मंदाकिनी भगत, पो. कॉ आकाश बाभुळकर पो. कॉ शुध्दोधन भगत यांनी पार पाडली आहे.