मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
अवैधरित्या विक्री करण्यासाठी आणण्यात आलेल्या खताच्या तब्बल २११ बँग जप्त करण्यात आल्या. खताचा साठा जप्त करण्याची कारवाई पुसद तालुक्यातील सावंगी या गावी रविवार दि. १ जून रोजी दुपारी कृषी आणि पोलिस विभागाने संयुक्तरित्या केली. या कारवाईनंतर विनापरवाना खताची विक्री बेभमपणे सुरू असल्याची गंभीर बाब उघड झाली आहे.या प्रकरणी सविस्तर असे की, तालुक्यातील सावंगी येथून पुसदमध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरित्या खताची विक्री होत असल्याची प्राथमिक माहितीकृषी व पोलिस विभागाला मिळाली होती. त्यानंतर ट्रकमधून २११ बॅग खताची मोठ्या प्रमाणात अवैधरित्या व विनापरवाना गावात खुलेआम विक्री होत असल्याचे उघडकीस आले. सावंगी बान्सी मार्गे मंगरूळ तालुक्यातून पुसद तालुक्यातील सांवगी येथे श्री ओम साई फर्टिलायझरचे गुजरातच्या सुरत येथील कंपनीतून आलेले किसान गोल्ड व कृषिरत्न या नावाचे खत अनधिकृतपणे शेतकऱ्यांना विक्री करीता येत असल्याचे आढळून आले आहे.जिल्हा कृषी अधिकारी डाबरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कृषी अधिकारी विजय मुकाडे, मोहीम अधिकारी प्रवीण जाधव, पंचायत समितीचे कृषी अधिकारी शंकर राठोड, तांत्रिक अधिकारी नितीन घाडगे, कृषी पर्यवेक्षक प्रफुल महेंद्र, कृषी सहाय्यक अंभोरे व नरवाडे यांच्या पथकाने केली.
