मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
पुसद तालुक्यातील वडगाव ग्रामपंचायत येथील बौद्ध बांधव आजही पिण्याच्या पाण्यापासून वंचित ग्रामपंचायत प्रशासनाचे सर्वात दुर्लक्ष वरिष्ठ प्रशासन लक्ष देतील काय बौद्ध बांधव पिण्याच्या पाण्यासाठी धडकले bdo कार्यालयात… सविस्तर वृत्त असे की भारत देश आज अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे परंतु आजही *शहरांचा विकास व खेडे मात्र अजूनही भकास!* अशीच परिस्थिती दिसत आहे. याचेच ज्वलंत उदाहरण म्हणजे वडगाव ग्रामपंचायत येथे बौद्ध वस्तीमधील नागरिकाना आजही पिण्याच्या पाण्यापासून वंचित वंचित राहावे लागत आहे हे मात्र शोकांतिका.या संपूर्ण प्रकाराकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे मात्र सरास दुर्लक्ष असल्याचे नागरिकांनीअमोल कुमार देविदास आंदेलवाड गटविकास अधिकारी पंचायत समिती कार्यालय पुसद येथे बोलताना सांगितले. ग्रामपंचायत वडगाव अंतर्गत बौद्ध वस्तीमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी बौद्ध बांधव नागरिकांना आजही खूप पायपीट करावी लागते ग्रामपंचायत मार्फत कोणत्याही प्रकारची नळ व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली नाही? ग्रामपंचायत मार्फत पाण्याची टाकी नळ योजना व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी या मागणीसाठी वडगाव येथील बौद्ध बांधव महिला नागरीक यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती पुसद यांच्या दालनामध्ये महिलांनी एककच टाहो फोडला पाणी उपलब्ध करून देण्यात यावी या मागणीचे देण्यासाठी निवेदन देण्यात आले.येत्या दोन दिवसात पाण्याची व्यवस्था न झाल्यास *हंडा कळशी बजाव उग्र आंदोलन* करण्यात येईल असा इशारा नागरिकांनी या वेळी दिला.यावेळी प्रामुख्याने उपस्थित राजरतन कांबळे, संतोष कांबळे, देवानंद इंगोले, जगदीश शिंदे, विकास पाईकराव, सुनील पाईकराव, रोहन पाईकराव, शशिकलाबाई पाईकराव, बेबीताई इंगळे, वनिता इंगळे, बेबीताई जोगदंडे, कल्याणी कांबळे, अनुसया पट्टेबहादूर, पुष्पा जोगदंडे,कविता कांबळे,अशा कांबळे, आदिवासी एकता परिषदेचे गणपत गव्हाळे, भीम टायगर सेनेचे किशोर दादा कांबळे इत्यादी निवेदन देते वेळेस उपस्थित होते. मुख्य संपादक सुर्यकांत राठोड जनता लाईव्ह न्युज
