मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
आज दिनांक 2 जानेवारी 2026 आजच्याच दिवशी म्हणजे 2 जानेवारी 1961 रोजी भारताचे तत्कालीन प्रधानमंत्री स्व.पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वज पोलीस दलाकडे प्रदान केला. या दिवसापासून 2 जानेवारी हा दिवस पोलीस स्थापना दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधुन पुसद येथील माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन पुसद, मिशन ग्रीन बहुउद्देशीय संस्था पुसद यांचे वतीने सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद कार्यालयामध्ये माननीय श्री हर्षवर्धन बी. जे (IPS) साहेब यांचा मानचिन्ह व वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला. व त्यांना महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी त्यांनी माणुसकीच्या भिंतीच्या कामाचे कौतुक केले. व माणुसकीच्या भिंतीला भेट देण्याचे आश्वासन दिले.. यावेळेस उपस्थित मान्यवर माणुसकीच्या भिंतीचे अध्यक्ष गजानन जाधव,अनंता चतुर,मधुकर चव्हाण,दिगंबर देशमुख ग्रीन मिशनचे अध्यक्ष रमेश डंबोंळे,पवन बोजेवार,देविदास खंदारे,प्रमोद ठाकूर,आदित्य जाधव,उपस्थित होते





























