मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
पुसद शहरात वाढलेल्या गुन्हेगारी प्रवृतीचे ईसमावर आळा बसावा या करीता ठाणेदार सेवानंद वानखडे यांनी प्रभावी गस्त (पेट्रोलींग) वाढवुन कारवाई करन्याचे आदेश पोलीस स्टेशनचे डी. बी. पथकास दिले त्याच सुचणे प्रमाणे दि.27/10/2025 रोजी पुसद शहर डी. बी. पथक शहरात पेट्रोलींग करीत असताना डी. बी. पथकास गोपनिय बातमीदार यांचे कडुन खात्रीलायक खबर मिळाली की, एक ईसम देशी पिस्टल (देशी कट्टा) सोबत बाळगुन असुन त्याचे ईनोव्हा गाडी क्र.MH-12-EM-0977 ने पुसद शहरात येत आहे. असे गोपनिय माहीती वरुण घटनेचे गांभीर्य ओळखुन डी.बी.स्टॉप.पथकांनी अतिशय कौशल्यपुर्वक सापळा रचुन ईनोव्हा चारचाकी वाहन क्र.MH-12-EM-0977 यास आंबेडकर चौक पुसद येथे थांबवुन चालक आरोपी दिनेश देविदास खोडे वय 38 वर्षे रा. मांजर्डा ता. जि. यवतमाळ यांची कायदेशीररीत्या अंगझडती घेतली असता त्यांचे कमरेला पँन्ट मध्ये खोसुन एक गावठी बनावटीची पिस्टल (देशी कट्टा) मॅगझीनसह किमंत रुपये 30,000/-रुपये व टोयोटा ईनोव्हा कंपनीची चारचाकी कारवाहन क्र.MH-12-EM-0977 किमंत 5,00000/रुपये असा एकुण 5,30,000/ रुपये चा मुद्देमाल मिळुन आल्याने त्यास घातक अग्नीशखासह अटक करुण त्याचेवर पोलीस स्टेशन पुसद शहर येथे कलम 3,25 शस्त्र अधिनियम 1959 प्रमाणे गुन्हा नोंद करुण पुढील तपास डी.बी.स्टॉप करीत आहेत.सदरची कारवाई – पोलीस अधिक्षक, श्री, कुमार चिंता, अप्पर पोलीस अधिक्षक, अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद हर्षवर्धन बि.जे. यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार सेवानंद वानखडे यांचे सुचणे प्रमाणे डी.बी.प्रमुख सपोनि प्रेमकुमार केदार, पोउपनि प्रमोद काळे, पोउपनि संतोष खांडेकर, पो.हवा. प्रफुल इंगोले, पो. हवा. मनोज कदम, पो.काँ. शुध्दोधन भगत, पो.कॉ. सचिन राउत, पो. कॉ. भोला कानडे यांनी पार पाडली आहे.

 
                                                                                                
							










 
			   
			   
			   
			   
			   
			   
			   
			   
			  

















