मागील १ महिन्यात पुसद अर्बन कॉ ऑप बँकेच्या ठेवीदारांमध्ये अनामिक भीती चे वातावरण पसरून अनेकांनी आपल्या ठेवी विड्रॉल करणे सुरु केले. मागील ४० वर्षांपासून बँकेच्या सर्व शाखांमध्ये रिजर्व बँकेच्या निकषानुसारच काम सुरु आहेत. त्यामुळे ठेवीदारांनी कोणतीही भीती न बाळगता आजपर्यंत बँकेवर ज्या विश्वासाने ठेवी ठेवल्या तो विश्वास कायम राखावा. बँकेचे संचालक मंडळ, सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी बँकेच्या ठेवीदारांचे हित महत्वाचे असून त्यासाठी सर्व पर्याय खुले ठेवले असल्याचे पुसद अर्बन बँक तर्फे अध्यक्ष शरद मैंद यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.शरद मैंद यांनी बँकेच्या स्थापने पासुन च्या यशस्वी वाटचालीची माहिती देतांना म्हणाले की सर्वसामान्य ठेवीदारांच्या सहकार्याने तसेच सर्वसामान्य कर्जदारांना सहज कर्ज उपलब्ध व्हावे या हेतूने बँकेचे संस्थापक सहकार सूर्य दिवंगत आप्पाजी आसेगावकर, पहिले अध्यक्ष दिवंगत बाबुशेठ हिराणी यांच्या पुढाकाराने व लोकनेते मनोहर भाऊ नाईकयांच्या प्रमुख मार्गदर्शनात माझे वडिल एड अप्पाराव मैंद यांच्या १२ वर्षांचा अध्यक्ष पदासह माझ्या २३वर्षाच्या अध्यक्ष पदाच्या कार्यकाळात पुसद अर्बन बँकेचे ४० वर्षांपूर्वी १शाखेच्या रुपात लावलेल्या रोपट्याचे आज महाराष्ट्रात ३७ शाखांचा वटवृक्षमध्ये रूपांतर झाले. नियमित ग्राहकोपयोगी सेवा, पारदर्शक बँकिंग, गरजु कर्जदारांना पत पुरवठा, ठेवीदारांना वेळेवर व्याज, ग्राहकाभिमुख अधिकारी कर्मचारी, सामाजिक उपक्रम या मुळे सर्वांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या पुसद अर्बन बँकेचे रिजर्व बैंक ऑफ इंडियाकडून नियमित इन्स्पेक्शन होऊन बँके आर.बी.आय. चे मापदंड पाळत आली आहे. त्यानुसार बँकेचा सीआरएआर ११ टक्के पेक्षा जास्त म्हणजे २१. ५७टक्के, सीआरआर ३. ५० टक्के, १२८ कोटी रु चा स्वनिधी आहे. बँकेजवळ बुडीत वसंशयित कर्ज निधी ३७कोटी ४१ लाख रु आहे. बँकेने आर बी आय व सहकार खात्याच्या प्रत्येक सूचनांचे वेळोवेळी पालन केले आहे. बँकेतील ५लाख रु पर्यंत च्या प्रत्येक ठेवीना डीआयसीजिसी अंतर्गत विमा सुरक्षा कवच आहे. बँकेच्या ४२५कोटी. रु. च्या कर्जा पोटी सुमारे ८०० कोटी रु च्या मालमत्ता गहाण आहेत. त्यामुळे त्यातून वसुली होणार असल्यामुळे ते सर्व कर्ज सुरक्षित आहेत. अश्या प्रकारे साउंड पोजिशन असलेल्या आपल्या पुसद अर्बन बँकेत सर्व काही सुरळीत व सुरक्षित सुरु असतांना अचानक १महिण्यापुर्वी झालेल्या अफवेतुन घाबरलेल्या ठेवीदारांनी आपल्या ठेवी विड्रॉलकरणे सुरु केल्याने लिक्विडीटी (रोखतरलता) वर परिणाम झाला आहे. यातून सावरण्यासाठी सर्व ठेवीदारांनी अफ़वावर विश्वास न ठेवता संयम बाळगण्याची गरज असून लवकरच सर्व परिस्थिती सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. स्वतःच्या कोणत्याही मान सन्मान, प्रतिष्ठ व नावासाठी अडून न राहता ठेवीदार, अधिकारी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी आम्ही सर्व संचालक मंडळ कटी बद्ध असून कोणत्याही ठेवीद्माच्या एक रुपयाला देखील धक्का लागणार नाही याची शास्वती आपण देत आहे. मागील १महिन्यात जिल्ह्यातील व पुसद मधील सर्व प्रसिद्धी माध्यमांनी दिलेल्या अमूल्य सहकार्याबद्दल यावेळी शरद मैंद यांनी विशेष आभार व्यक्त केले. यावेळी जेष्ठ संचालक के. आय. मिर्झा, ललित सेता, निळकंठ पाटील, विनायक डुबेवार, प्रवीर व्यवहारे, सुनील चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक सेवकर आदी उपस्थित होते.

 
                                                                                                
							











 
			   
			   
			   
			   
			   
			   
			   
			  














