मुख्य संपादक सुर्यकांत राठोड सहसंपादक सिद्धार्थ कदम
महागाव:परभणी शहरात दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर काही घाणेरड्या प्रवृत्तीच्या नराधमांनी बलात्कार केला. या क्रूर घटणेला जवळपास एक महिना होत असतांना सुध्दा आरोपींवर कुठलीही कठोर कारवाई झाली नाही. पीडीत कुटूंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी भारत मुक्ती मोर्चा, लहुजी क्रांती मोर्चा, बुध्दीस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, भारतीय विद्यार्थी मोर्चा आणि राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती ह्या राष्ट्रव्यापी संघटनेनी हस्तक्षेप करत प्रशासनाला वेठीस धरले आहे. महाराष्ट्रातील एकूण 36 जिल्ह्यामध्ये निवेदन देत पिडीत अल्पवयीन मुलीला न्याय मिळवून देण्याची मागणी संघटने तर्फे राज्यपालांना करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून महागाव तालुक्यात सुध्दा मा. तहसीलदार साहेब महागाव यांच्या मार्फत मा. राज्यपालांना निवेदन देण्यात आले आहे. सदर घटनेच्या ठिकाणा वरील आणि आजूबाजूच्या परिसरातील CCTV फुटेज गोळा करून अन्य आरोपींना तत्काळ अटक करावी, सर्व आरोपींची नार्को टेस्ट करावी, हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा, गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी, पिडीताच्या परीवारास 25लाख ₹ त्वरित मदत करून परीवाराचे पुनर्वसन करावे, मेडिकल वरील नशायुक्त औषधी व इंजेक्शन डॉक्टरच्या परवानगी शिवाय कोणालाही देऊ नये जेणेकरून अशा घटना भविष्यात होणार नाहीत. अशा प्रमुख मागण्या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आल्या. यावेळी लहुजी क्रांती मोर्चाचे संजय बनसोडे, भारतीय विद्यार्थी मोर्चाचे जयशील कांबळे, समाधान पंडागळे, शुभम खंदारे, अनिल लहाने, मारोती दोडके, संतोष भालेराव, मायाताई पाईकराव, वंदना गायकवाड, रमेश कांबळे, सुनिल भोने, राहुल गायकवाड आणि इतरही संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.या निवेदनाची दखल घेत प्रशासनाने ठोस कारवाई न केल्यास नऊ एप्रिल रोजी राष्ट्रव्यापी जेलभरो करण्यात येईल, असे संतप्त मत भारतीय विद्यार्थी मोर्चाचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष जयशील कांबळे यांनी व्यक्त केले.
