मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
:ता.05 मार्च 2025वसंतराव नाईकांच्या जन्म आणि कार्याने महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला दिशा देणाऱ्या महामानवाच्या पुसद तालुक्यात ज्ञानप्रकाश लोकसंस्था आणि वसंत बहार ऍग्रोटेक द्वारा तालुक्यातील अनेक गावात जैविक शेतीचे यशस्वी प्रयोग करण्यात आले आहे.दिवसेंदिवस रासायनिक खत आणि औषधीनी शेतकऱ्यांचा खर्च वाढत असून जमीन कडक होत चालली आहे,जमीनीतील मित्र किटक,शेतकरी मित्र गांडूळ नष्ट झालेले आहेत.पर्यावरणाचे संतुलन झपाट्याने बिघडत आहे, माती नापिक होत चालली असताना तालुक्यातील माजी जि.प. सदस्य व सामाजिक कार्यकर्ते श्री. रामराव चव्हाण यांच्या पुढाकाराने व त्यांच्या नेतृत्वात जैविकशेती जागृती अभियान राबविण्यात येत आहेत. जैविकशेती प्रयोगाने शेतकऱ्यांच्या खर्चात कपात,उत्पन्नात वाढीसोबत जमीन ढिली बनत असल्याने शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष अनुभवाने उत्साह वाढला असून नवे प्रयोग करण्यासाठी पुसद तालुक्यातील शेतकरी पुढे सरसावत आहेत ही बाब सर्वांसाठी दिशादर्शी व प्रेरणादायी आहे.महामानव समग्र क्रांतीचे प्रेरणास्थान वसंतराव नाईकांच्या संकल्पनेतील वसंत सागर (पुस-धरण) प्रकल्पाच्या कुशीतील व अन्य क्षेत्रातील जमशेटपूर, जनोना,चिखली,वनवारला,मोहा,भोजडा इत्यादी गावातील प्रयोगशील शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष त्यांच्या शेतात जावून मनोगत घेण्यात आले, झाडाखाली व जिथ जसं जमेल तसं चर्चा कण्यात आली व त्यांचे मनोगत घेण्यात आले, त्यांचा सत्कार करण्यात आला. मार्च महिन्यातील रामनवमीच्या पूर्व संधेला हा कार्यक्रम घेण्यात आला.प्रामुख्याने श्री.नरेंद्र चव्हाण,श्री.वसंता कोकाटे,श्री.जेता राठोड,श्री.विष्णू राठोड,श्री.राजू पवार,श्री.अनिल राठोड,श्री.अशोक पवार,श्री.अविनाश राठोड,श्री.संतोष वऱ्हाडे,श्री.प्रवीण ठाकरे, या प्रयोगशील शेतकऱ्यांचा सहभाग होता.सर्व शेतकऱ्यांनी वसंत बहार ऍग्रोटेक द्वारा वितरीत शासनाद्वारा प्रमाणित मॅक्स रुट या प्रॉडक्टचा वापर करण्यात आला होता.जैविकशेती जागृती अभियानसाठी वसंत बहार ऍग्रोटेक,नागपूरचे श्रीपतभाऊ राठोड हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभले. कु.दिपाली राठोड द्वारा संपूर्ण कार्यक्रमाचे चित्रिकरणही करण्यात आले. जैविकशेती जागृती अभियान दौऱ्याच्या यशस्वीतेसाठी सामाजिक कार्यकर्ते श्री.वैजनाथ ढवळे, युवा नेतृत्व श्री.नरेंद्र रामराव चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले.
