मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
सहसंपादक सिद्धार्थ कदम
प्रमुख वक्ते: अजिंक्य चांदणे
-धम्मनायक सम्राट अशोक, महात्मा फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव प्रज्ञा पर्व कार्यक्रमातील पहिले 4थे धम्मनायक सम्राट अशोक, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञापर्व समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून काल दिनांक 10 एप्रिल 2025 रोजी अजिंक्य चांदणे सोलापूर हे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.सर्व प्रथम प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून धम्मनायक सम्राट अशोक,छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. *परिवर्तन बहुउद्देशीय महिला मंडळ शिवाजी वार्ड, व पारमिता महिला मंडळ महावीर नगर यांच्या वतीने बुद्ध वंदना घेण्यात आली*.*तसेच संविधानाचा जागर हे पथनाट्य संबोधी महिला मंडळ श्रावस्ती नगर यांची प्रस्तुती होती* *या कार्यक्रमातील मुख्य आकर्षण कस्तुरी मस्के या छोट्या बालिकेने आईने विचारलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वरील 25 प्रश्नांना धडाकेबाज उत्तरे दिल्याने तिचे छोटेखानी भाषण आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले.* *यावेळी अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना आप्पाराव मैंद**म्हणाले की 1973 पासून सुरू झालेले जयंती पर्व आजपर्यंत प्रज्ञापर्व नावाने अविरतपणे सुरू असून, आपण सर्वांनी संविधान जागृतीसाठी काम केले पाहिजे आजचे सरकार हे संविधान विरोधी वागत असल्याचे अनेक उदाहरणातून आपल्याला दिसून येते त्यापैकी, महाबोधी विहार मुक्तीसाठी संघर्ष सुरू असून तसेच वक्फ बिल मंजूर केल्याने ते विरोधी असल्याचे दिसून येत आहे* सभागृहातील उपस्थित लोकांना ज्ञानाची भूक लागलेली आहे, ज्याप्रमाणे शरीराला भूक लागते, तशीच ही लागलेली ज्ञानाची भूक आयोजित केलेल्या प्रज्ञा पर्व व्याख्यानमालेतून आपल्याला मिळत असल्याने अशा प्रबोधन पर्व मालिकेची नितांत गरज आहे, आणि तशी ती आपण निर्माण ही केलेली आहे. असे गौरवोद्गार त्यांनी याप्रसंगी बोलताना काढले, माझ्यासारख्या मातंग समाजातील आंबेडकरी विचाराची प्रेरणा घेऊन परिवर्तनशील मार्गाने जाणाऱ्या कार्यकर्त्यास आपण या प्रबोधन परवात बोलावून माझा मानसन्मान केला ही माझ्या साठी गौरवास्पद बाब असल्याचे डीपीआयचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा तथा आंबेडकर विचाराची बुलंद तोफ अजिंक्य चांदणे हे प्रज्ञा पर्व 2025 व्याख्यानमालेतील चौथ्या सत्रा मध्ये बोलताना त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी सर्वच प्रमुख उपस्थित अतिथी यांना प्रज्ञा पर्वत समितीच्या वतीने ट्रॉफी शील व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाला प्रमुख वक्ते, अजिंक्य चांदणे, या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आप्पाराव मैंदमहेश हंबर्डे, दिगंबर जगताप, ऍड, विश्वास भवरे, शशांक खंदारे नरेंद्र खंदारे, भारत कांबळे, डॉ. प्रशांत वासनिक, तानाजी काळे, याडीकार पंजाब चव्हाण, देविदास गजभार, सुभाष इंगळे वाशिम,इत्यादीची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, कार्याध्यक्ष राजेश ढोले तर आभार देवेंद्र खडसे यांनी केले.या कार्यक्रमाला महिला, बालक, पुरुष व असंख्य बौद्ध बांधव उपस्थित होते.
