मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
सहसंपादक सिद्धार्थ कदम
दि.11/04/2025 रोजी डी. बी. पथक पोलीस स्टेशन पुसद शहर यानां गोपनिय माहीती मिळाली की. एक ईसम गांजा अमली पदार्थ अवैध्यरीत्या विक्री करीता के. डी. जाधव तांडा येथे शेतात येत आहे. अशा मिळालेल्या गोपनिय माहीतीचे आधारे डी. बी. पथक सापला रचुन बसले असता एक ईसम मोटर सायकल घेउन आला त्यास आमची पोलीसाची चाहुल लागताच सदर ईसम त्याची मोटर सायकल सोडुन पळुन गेला त्याचा पाठलाग केला पंरतु तो मिळुन आला नाही. त्याचे मोटर सायकल क्र. MII-29-CH-1533. ची पाहणी केली असता मोटर सायकल वर 1) एका पिवळ्या थैलीत गांजा अमली पदार्थ वजन । किलो 100 ग्रॅम किंमत अंदाजे 10 हजार रुपये एक हिरो कंपनीची पेंशन प्लस मोटरसायकल क्रमांक मोटर सायकल MH-29-CH-1533 मोटर सायकल किंमत अंदाजे 1 लाख रुपये असा एकूण 1 लाख 10 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करुण मोटर सायकल चालक यांचे विरुध्द कलम 8 (c), 20(b),ii (b) गुंगीकारक औषधीद्रव्य पदार्थ मनोविकारावर होनारे परीनाम कायदा 1985 (N.D.P.S.) कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करुण पुढील तपास पोउपनि किशोर खंडार व डी. बी. पथक कारवाई करीत आहे.सदरची कारवाई पोलीस अधिक्षक, श्री, कुमार चिंता, अप्पर पोलीस अधिक्षक, पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद श्री, हर्षवर्धन बी. जे. साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर यांचे सुचनाप्रमाणे डी.बी.प्रमुख सपोनि निलेश देशमुख, पो.हवा. प्रफुल इंगोले, पो.हवा. मनोज कदम, पो.कॉ. शुद्धोधन भगत, पो, कॉ, आकाश बाभुळकर यांनी केली आहे.
