मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
सहसंपादक सिद्धार्थ कदम
यवतमाळ जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, अवैध शस्त्र (अग्नीशस्त्र) बाळगणा-या तसेच अ उघड गुन्हे, आरोपी शोध तसेच गुंगीकारक औषधद्रव्याची तस्करी समुळ उच्चाटन व्हावे याकरीता मा. पोलीस अधीक्षक श्री.कुमार चिंता (भा.पो.से) यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिनस्थ पथकांना गोपनिय माहीती काढून अ उघड गुन्हे उघड करुन आरोपी शोध घेणे बाबत सुचना दिल्या आहेत.दिनांक 28/03/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथक यवतमाळ कॅम्प पुसद हे अ उघड गुन्हे मधील आरोपी शोध व माहीती काढत असतांना गुप्त बातमीदाराव्दारे माहीती मिळाली कि, पोलीस स्टेशन बिटरगांव अप क्रमांक 84/2025 कलम 305 भान्यासं हा गुन्हा आरोपी नागनाथ जायभाय यांनी केला असून तो मौजे बोरी (खुर्द) ता. कंधार जि. नांदेड येथील असल्याचे तसेच तो त्याचे गावी बोरी (खुर्द) ता. कंधार जि. नांदेड येथे असल्याबाबत गोपनिय माहीती मिळाल्याने सदर गुन्हयातील आरोपी शोध कामी मौजे बोरी (खुर्द) ता. कंधार जि. नांदेड येथे नमूद पोलीस पथक रवाना होवून सदर ठिकाणी जावून पोलीस कौशल्याचा व तांत्रीक माहीती काढून आरोपी नामे नागनाथ संग्राम जायभाय वय 21 वर्ष रा.बोरी (खुर्द) ता. कंधार जि. नांदेड यास ताब्यात घेवून पोलीस कौशल्याचा वापर करुन त्याचेकडे पोलीस स्टेशन बिटरगांव अप क्रमांक 84/2025 कलम 305 भान्यासं या गुन्हयातील चोरीस गेलेल्या 14 ग्रॅम सोन्याचे दागिने बाबत विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्याने गुन्हा केला असल्याचे कबूल केल्याने व नमूद पथकांची खात्री झाल्याने आरोपी नामे-नागनाथ संग्राम जायभाय वय 21 वर्ष रा.बोरी (खुर्द) ता. कंधार जि. नांदेड यास ताब्यात घेवून पुढील तपास कामी पोलीस स्टेशन बिटरगांव यांच्या ताब्यात दिले.सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. कुमार चिंता सा, मा.अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री.पियुष जगताप सा, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. हनुमंत गायकवाड सा, मा. पोलीस निरीक्षक श्री. सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचे मार्गदर्शनात सहा. पोलीस निरीक्षक गजानन गजभारे, पोउपनि/शरद लोहकरे, चापोउपनि रविंद्र शिरामे, पोहवा/संतोष भोरगे, पोहवा/तेजाब रणखांब, पोहवा/सुभाष जाधव, पोहवा/रमेश राठोड, पोहवा कुणाल मुंडोकार, पोशि/सुनिल पंडागळे, सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

 
                                                                                                
							











 
			   
			   
			   
			   
			   
			   
			   
			  


















