पुसद प्रतिनिधी अशोक मेटकर
यवतमाळ जिल्ह्यातील कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, अवैध शस्व सुरु राहणार नाही तसेच अउघड गुन्हे, आरोपी शोध, अवैध धंदयाचे समूळ उच्चाटन व्हावे याकरीता मा. पोलीस अधीक्षक कुमार चिंता सा यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिस्थान पथकांना गोपनिय माहीती काढून प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सुचना दिल्या आहेत.दिनांक 12/10/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुसद शहर पोलीस स्टेशन अप क्रमांक 545/2025 कलम 303(2) भान्यार्स या गुन्हयाचा संमातर तपास करीत असतांना नमूद पथकांने हिराणी बंधू दुकानातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली असता त्यामध्ये अज्ञात बुरखाधारी महोला दिसून आल्याने पोलीस कौशल्याचा वापर करुन गोपनिय बातमीदारा मार्फत माहीती काढली कि, दिनांक 06/10/2025 रोजी पुसद शहरातील हिराणी बंधू कापड दुकानातून चोरी करणा-या बुरखाधारी महीला हया नदिड परिसरातील असल्याबाबत माहीती संकलीत करुन सदर बुरखाधारी अज्ञात महीलेचा शोध घेण्याकामी वरिष्ठांच्या परवानगीने नांदेड येथे जावून अज्ञात बुरखाधारी महोला हया 1) फरजाना बेगम शेख नईम वय 43 वर्ष 2) फईम बेगम हकिम खान चय 50 वर्ष दोन्ही रा.श्रावस्ती नगर नांदेड असे असल्याचे निष्पन्न करुन त्यांना नांदेड येवून ताब्यात घेवून त्याच्याकडून गुन्हयातील चोरीस गेलेल्या सर्वच्या सर्व 08 वेगवेगळया रंगाच्या साडया किंमत 35,000/- रुचा मुददेमाल जप्त करुन ताब्यात घेतला.सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री.कुमार चिंता (भा.पो.से) सा, मा. अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. अशोक थोरात (म.पो.से) सा, मा. सहा पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. हर्षवर्धन बो जे सा. मा.पोलीस निरीक्षक श्री. सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, वांचे मार्गदर्शनात सपोनि धिरज बांडे, पोउपनि शरद लोहकरे, सफी/मुन्ना आडे, पोहवा संतोष भोरगे, पोहया तेजाब रणखांब, पोहवा सुभाष जाधव, पोहवा कुणाल मुंडोकार, पोहया रमेश राठोड, पोशि/सुनिल पंडागळे, चापोउपनि रविंद्र शिरामे, पोशि राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ मपोशि/जयाश्री श्रीरामजवार पो स्टे पुसद शहर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

 
                                                                                                
							










 
			   
			   
			   
			   
			   
			   
			   
			   
			  














