पोलीस उपविभाग पुसद व उमरखेड हददीतील चोरी, घरफोडी, मोटार साईकल चोरी असे गुन्हे उघडकीस आणणे तसेच अवैध धंदे याचे शोध सह कार्यवाही संबंधाने मा. श्री. कुमार चिंता (भा.पो.से.), पोलीस अधीक्षक यवतमाळ यांनी आदेशीत केले होते. त्याप्रमाणे उपविभाग पुसद व उमरखेड हददीतील घरफोडी चोरी करणा-या आरोपी शोध कामी सायबर सेल यवतमाळ यांच्याकडून तांत्रीक विश्लेषन करुन तसेच गोपनिय माहीतीव्दारे ग्राम काटखेडा पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण जि. यवतमाळ येथे काही महीन्यापुर्वी झालेली घरफोडी १) पवन सुरेश पवार व त्याचे साथीदार २) सोपान शालीक व्यवहारे, ३) शिलानंद अर्जुन पडघणे ४) दिनेश शालीक व्यवहारे सर्व रा.वडद यांनी केले असल्याबाबत तांत्रीक विश्लेषन व गोपनिय माहीती मिळाल्याने आरोपी शोध कामी ग्राम वडद ता. महागांव येथे जावून पोलीस कौशल्याचा वापर करुन अतिशय शिताफिने १) सोपान शालीक व्यवहारे, २) शिलानंद अर्जुन पडघणे ३) दिनेश शालीक व्यवहारे सर्व रा.वडद यांना ताब्यात घेवून त्याचेकडे पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण अप क्रमांक ३२४/२०२५ कलम ३०५ (अ), ३३१ (४) भान्यांस या गुन्हयाचे अनुषंगाने अतिशय कौशल्यपुर्वक विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले. त्यानंतर नमूद आरोपी कडे अतिशय चिकाटीने कौशल्यपुर्वक अधिक विचारपूस केली असता त्यांनी यवतमाळ जिल्हयातील ०७घरफोडी व ०१ दरोडा असे ०८ गुन्हे केली असल्याचे कबूल केल्याने त्यांचे कडून खालील प्रमाणे गुन्हे उघड केले.अ.क्र०१.०२.०३.०४.०५.०६.०७.०८.पोलीस स्टेशनपोलीस स्टेशन पुसद ग्रामीणपोलीस स्टेशन पुसद शहरपोलीस स्टेशन खंडाळापोलीस स्टेशन महागांवपोलीस स्टेशन महागांवपोलीस स्टेशन महागांवपोलीस स्टेशन उमरखेडपोलीस स्टेशन यवतमाळ शहरअप क्रमांकअप क्रमांक ३२४/२०२५ कलम ३०५ (अ), ३३१ (४) भान्यासं.अप क्रमांक १८/२०२५ कलम ३०५ (अ), ३३१ (४) भान्यासं.अप क्रमांक ३६/२०२५ कलम ३०५ (अ), ३३१ (४) भान्यासं.अप क्रमांक १४१/२०२५ कलम ३०५ (अ), ३३१ (४) भान्यास.अप क्रमांक १४९/२०२५ कलम ३०५ (अ), ३३१ (४) भान्यासं.अप क्रमांक २६६/२०२५ कलम ३०५ (अ), ३३१ (४) भान्यासं.अप क्रमांक १४१/२०२५ कलम ३०५ (अ), ३३१ (४) भान्यासं.अप क्रमांक ७३०/२०२५ कलम ३११ भान्यासं.अशाप्रकारे सदर तिन्ही आरोपीतांकडुन ०१ दरोडा ०७ घरफोडी गुन्हे उघड करुन त्यांच्याकडून सोन्या, चांदीचे दागिणे, रोख रक्कम व मोबाईल असा एकूण ९४,५५८/-रु मुददेमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. नमूद आरोपी १) सोपान शालीक व्यवहारे वय २२ वर्ष २) शिलानंद अर्जुन पडघणे वय ३० वर्ष ३) दिनेश शालीक व्यवहारे वय २६ वर्ष सर्व रा. वडद ता. महागांव जि. यवतमाळ यांना पुढील तपास कामी पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण यांच्या ताब्यात दिले.सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. कुमार चिंता सा, मा. अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. अशोक थोरात सा मा. सहा पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद श्री हषर्वधन बी.जे सा तसेच मा. पोलीस निरीक्षक श्री सतीष चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, मा. पोलीस निरीक्षक येशोधरा मुनेश्वर सा सायबर सेल यवतमाळ, यांचे मार्गदर्शनात स.पो.नि/धिरज बांडे, पोउपनि/शरद लोहकरे, सफौ/मुन्ना आडे, पोहवा/संतोष भोरगे, पोहवा/तेजाब रणखांब, पोहवा/सुभाष जाधव, पोहवा/रमेश राठोड, पोहवा/कुणाल मुंडोकार, पोशि/सुनिल पंडागळे, चापोउपनि रविंद्र शिरामे, चापोशि/राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ तसेच पोहवा/सुमित पालेकर, पोशि/दिगांबर पिलावन, मपोशि/प्रगती कांबळे, मपोशि/रोशनी जोगळेकर सायबर सेल यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
