मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
पुसद ज्येष्ठ नागरिक संघाद्वारे नेहमी नवनवीन समाजोपयोगी उपक्रम हाती घेतले जातात. ह्या वयातील ह्यांचा हा उत्साह खरोखरच खूप वाखाणण्यासारखा आहे. प्रसिद्धीपासून दूर असणाऱ्या सेवाव्रतीच कार्य समाजासमोर आणणं हे आपलं कर्तव्य आहे ह्याची जाण ठेऊन आज अशा शहरातील विविध क्षेत्रात सेवा देणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला ह्याबद्दल ज्येष्ठ नागरिक संघाचे अभिनंदन “असे भावोत्कट उदगार दीपक आसेगावकर ह्यांनी काढले. पुसद ज्येष्ठ नागरिक संघाद्वारे आयोजित कोजागिरीच्या कार्यक्रमात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सेवाभावी व्यक्तींच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.ह्या प्रसंगी बोलतांना प्रमुख अतिथी व कार्यक्रमाचे प्रायोजक डॉ. नदीम म्हणाले,”मुळात पुरस्काराचे “पंचरत्न “हे नावच ह्या सत्कार मूर्तिच्या कार्याची ओळख करून देते. आपल्या शहरात अशी ही पाच रत्न आहेत. समाजाच्या अत्यंत नाजूक वेळी निरपेक्ष भावनेने सेवाभावाने मदत करणारी ही खरी झाकली माणकं आज ज्येष्ठ नागरिक संघाने आपल्या सगळ्यांसमोर आणली ये त्यांचंही कार्य कौतुकास्पद आहे.” ज्येष्ठ नागरिक संघाद्वारे आयोजित कोजागिरी कार्यक्रमात विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या पाच व्यक्तींना “पंचरत्न पुरस्काराने” सन्मान चिन्ह व सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्याच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक संघाचे यवतमाळचे बळवंतराव चिंतावार होते त्यांनी ज्येष्ठासाठी असणाऱ्या विविध योजना ई. बद्दल माहिती दिली. ह्याप्रसंगी सरकारी दवाखान्यात येणाऱ्या रुग्ण व त्यांचे नातेवाईक ह्यांना सकाळचा नाश्ता, दुपारचं व सायंकाळचं जेवण, वृद्धाश्रमातल्या ज्येष्ठाना दिवाळीसारख्या सणावारांना कपडे, जेवण ई. सेवा, विरमरण आलेल्या सैनिकांच्या विधवाना भरघोस मदत, कोरोना काळात गरजूना सोळा हजारावर धान्यकीट वाटप असं खूप मोठं कार्य करणारे माणुसकीच्या भिंतचे संचालक गजानन जाधव यांचे वडील शेतीनिष्ठ शेतकरी दत्तात्रय बापूराव जाधव यांचा सत्कार लहान मुलांना हृदयाला असणारे छिद्र व अन्य आजार, कँसर रुग्ण, लिव्हर/ बोनमॅरो प्रत्यारोपण अशा अनेक आजारात मोफत ईलाज करणारे दवाखाने, मदत करणाऱ्या संस्था ह्याविषयीची माहिती व मार्गदर्शन करणारे, रुग्णांना आत्तापर्यंत पाच हजारावर रक्तदाते उपलब्ध करून देणारे रुग्णमित्र फौंडेशनचे शांतिसागर इंगोले कुष्ठरोगी तथा एड्स सारख्या दुर्धर आजारात रुग्णांना समुपदेशन करून उपचार उपलब्ध करून देणारे community based organisation मार्फत समुदाय संघटन, आई मला वाचव ई. प्रकल्प राबविणारे राहुल गायकवाड व्यक्तीच्या निधनानंतर दुःखात असलेल्या कुटुंबाच्या दारात स्वर्गरथ पाठविण्यापासून, अंत्यविधीची सगळी व्यवस्था करून देणारे, झोळी घेऊन मोक्षधामाच्या विकासासाठी मदत मागणारे ललित सेता एका सधन कुटुंबात वाढलेली बालपण ऐश्वर्यात घालवलेली, एम टेक, पी एच डी प्राप्त केलेली, सधन कुटुंबात वावरणारी, परंतु बालशिक्षणाची तळमळ असणारी मुलांच्या सर्वांगीन विकासासाठी तळमळीने कार्य करणारी डॉ. सौ. प्रणिता चव्हाण अशा थोर कामं करणाऱ्या शहरातील पाच व्यक्तींचा “पंचरत्न पुरस्कार “, सन्मान चिन्ह, सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला. कोजागिरीचे औचित्य साधून सुप्रसिद्ध कलाकार संजय कोरटकर व चमू ह्यांनी बहारदार संगीताचा कार्यक्रम सादर केला. कोजागिरीची माहिती, सणाचं धार्मिक तथा आयुर्वेदिक महत्व, सत्कारमूर्तीच्या कार्याची माहिती प्रास्तावीकात देत कार्यक्रमाचं बहारदार संचलन संस्थेचे सचिव शाम जोशी ह्यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता संघाचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, उपाध्यक्ष दयाराम चव्हाण, डॉ नदीम,शिकरे, उबाळे, कोसलगे अनंता भाऊ चतुर ह्यांनी प्रयत्न केले. सर्वधर्म प्रार्थनेने सुरुवात झालेल्या कार्यक्रची सांगता पसायदानाने झाली. आगळ्या वेगळ्या कोजागिरीच्या कार्यक्रमाला संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.





























