मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
उफुले शाहू आंबेडकरी चळवळीचे निष्ठावंत कार्यकर्ते तथा भीम टायगर सेनेचे यवतमाळ जिल्हा महासचिव अण्णा दोडके यांचे दि. 3/10/2025 रोजी सकाळी 4:00 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांचा अंत्यविधी त्यांचे राहते गावी काटखेडा येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात दुपारी 2:00 वाजता संपन्न झाला. यावेळी शोकसभा घेण्यात आली. अण्णा दोडके उर्फ श्रीराम दोडके असे नाव असलेले अण्णा दोडके नावाने परिचित होते भीम टायगर सेना या संघटनेत समाविष्ट झाल्या नंतर त्यांनी प्रामुख्याने धम्म परिवर्तन केले धम्मदीक्षा घेतल्या नंतर संघटनेच्या माध्यमातून त्यांनी बौद्ध धम्माच्या विचाराने आपले जीवन जगले व सर्व संस्कार की त्यांनी धम्माच्या विचाराने जीवनभर प्रेरित केले फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून त्यांनी नेहमीच आंबेडकरी विचाराला पेरण्याचे काम केले त्यामुळे त्यांच्या अंत्यसंस्कार यात्रेला जिवलग मित्र कार्यकर्ता पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.*आपल्याला जर मरण आले तर शेवटची इच्छा म्हणून त्यांनी आपल्याला बौद्ध परंपरेनुसार आपला अंतिम विधी व्हावा, व निळ्या ध्वजाचे प्रतीक माझ्या अंतयात्रेत असावे अशी त्यांची शेवटची इच्छा त्यांनी कार्यकर्ता म्हणून किशोर कांबळे यांच्या कडे व्यक्त केली होती. शेवटी त्यांना

भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. त्यांच्या अंत्ययात्रेला कार्यकर्ता पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शोकाकुल परिवार उपस्थित होता त्यावेळी शोकसभा ही घेण्यात आली .यावेळी शोकाकुल सभेत अण्णा दोडके यांच्या बद्दल बोलताना भिम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर दादा कांबळे म्हणाले की मी नागपूर येथे असताना *काळाने घात केला आणि अन्ना दोडके यांना माझ्या पासून घेऊन गेले आणि मला पोरके केले*, असे बोलताना त्यांचे अश्रू अनावर झाले होते.अशा ज्येष्ठ ऊर्जावान कार्यकर्त्याबद्दल दादासाहेब शेळके म्हणाले की धम्म स्वीकारून नव चेतना निर्माण करणाऱ्या अण्णा दोडके हे संघटनेचे कार्यकर्ता म्हणून आपल्या सर्वांसाठी आदर्श धम्म बांधव आहेत* या शोकसभेला भीम टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष, दादासाहेब शेळके, किशोर दादा कांबळे,भोलेनाथ कांबळे बुद्धरत्न,भालेराव भालेराव,पत्रकार राजेश ढोले,गौतम तुपसुंदरे देवेंद्र खडसे,नारायण ठोके,जनार्दन गजभिये, मिलिंद जाधव, सारकिनी येथील कांबळे, कलावंत घरडे इत्यादीनी शोक सभेमध्ये आपले मनोगत व्यक्त केले. या शोकसभेला सर्वच क्षेत्रातील कार्यकर्ता, पदाधिकारी,ज्येष्ठ नागरिक युवक महिला, ग्रामस्थ यांची प्रमुख उपस्थिती होती.

 
                                                                                                
							










 
			   
			   
			   
			   
			   
			   
			   
			  
















