मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी गुलाब नबी आझाद उर्दू हायस्कूल पुसद व ज्युनिअर कॉलेज सायन्स अँड आर्ट्स मध्ये स्वच्छता पंधरवडा 16 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधी दरम्यान विद्यालयामध्ये राबविण्यात आला ज्यामध्ये विविध स्वच्छते विषयी जनजागृतीचे उपक्रम घेण्यात आले ज्यामध्ये स्वच्छते विषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी विद्यार्थी व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली त्यानंतर पालकांसाठी स्वच्छतेविषयी पालक सभा घेण्यात आली त्यानंतर शाळेच्या परिसरामध्ये स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी स्वच्छतेसाठी श्रमदान केले तसेच शाळेमध्ये स्वच्छ भारत सुंदर भारत या विषयांतर्गत निबंध स्पर्धा ठेवण्यात आली अशी विविध कार्यक्रम या स्वच्छता पंधरवडा 2025 अंतर्गत विद्यालयात घेण्यात आले शेवटी 30 सप्टेंबर 2025 रोजी या कार्यक्रमाचे या कार्यक्रमातील उपक्रमाचे बक्षीस वितरण व समारोप करण्यात आला या उपक्रमाचे नोडल अधिकारी शाळेतील उपक्रमशील शिक्षक सय्यद सलमान सय्यद शेरू होते. त्यांनी योग्य नियोजनानुसार प्रत्येक दिवशी शासनाच्या पत्रकानुसार शाळेत विविध उपक्रम घेतले यामध्ये शेवटी या स्वच्छता पंधरवडा उपक्रमाचे 30 सप्टेंबर 2025 रोजी बक्षीस वितरण व समारोपीय कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष फराह दिबा मॅडम होत्या तर प्रमुख पाहिजे म्हणून बिल्कीस मॅडम आणि तारिक अहेमद सर होते.तर कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये उमर फारुक सर,आतिफ रजा सर,मो.साकिब सर,सय्यदा जवेरिया,असकिया अंजुम मॅडम उपस्थित होते.तसेच शाळेतील मुख्याध्यापक मोहम्मद सादिक शेख सरांनी स्वच्छता पंधरवडा उपक्रम शाळेत यशस्वी राबविल्या बद्दल या उपक्रमाचे नोडल अधिकारी सैय्यद सलमान सरांचे आणि सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या.

 
                                                                                                
							










 
			   
			   
			   
			   
			   
			   
			   
			  















