मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
सहसंपादक सिद्धार्थ कदम
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदर्यकरण व सुशोभीकरण समिती अध्यक्ष, मा. भीमराव दादा कांबळे यांचे यांचे अध्यक्षते खाली शिष्टमंडळाची भेट” पुसद शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सौंदर्यकरण व सुशोभीकरण समिती अध्यक्ष भीमराव दादा कांबळे यांच्या नेतृत्वात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री अभिजीत वायकोस साहेब यांची भेट घेऊन , महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी पुतळा सौंदर्यीकरण व सुशोभी करणा बाबत निर्देशित केलेल्या पत्राची फाईल मा कार्यकारी एम एम माथुरकर कार्यकारी अभियंता यांना देऊन संदर्भीय विषयानुसार आपण सार्वजनिक बांधकाम विभागाशी समन्वय साधावा व विविध एनओसी संदर्भात चर्चा करावी अशा विविध विषयावर विषयांकित चर्चा करण्यात आली.यावेळी प्रामुख्याने उपस्थित, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सौंदर्यकरण व सुशोभीकरण समितीचे अध्यक्ष,भीमराव दादा कांबळे,उपाध्यक्ष किशोर कांबळे,स.डॉ. राजेश वाढवे, सहसचिव राजेश ढोले, तांत्रिक सल्लागार महेंद्र कांबळे इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती.
