मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
सहसंपादक सिद्धार्थ कदम
पंचायत समिती बुलढाणा गटशिक्षणाधिकारी मोहिनी प्रल्हाद खंदारे यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करत यवतमाळ जिल्ह्याचा सन्मान वाढविला आहे. त्यांना देशभरातून 844 वा क्रमांक प्राप्त झाला असून, केंद्रीय प्रशासकी य सेवेत निवड झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील रहिवासी असलेल्या मोहिनी प्रल्हाद खंदारे या ग्रीन पार्क जगदंबा मंदिराजवळ असलेले सेवानिवृत्त विस्तार अधिकारी पी. डी. खंदारे यांची मुलगी असून त्यांनी पुण्यात कोचिंग क्लासेस करून त्यानंतर स्वतःच्या अभ्यासावर भर देत स्वतः अध्ययनाद्वारे यश मिळविले, याआधी 2021 मध्ये एमपीएससी परीक्षेत यशस्वी झाल्या होत्या. आणि उपशिक्षणाधिकारी पदावर निवड झाली2023 मध्ये बुलढाणा पंचायत समितीत गटशिक्षणाधिकारी पदावर परी वी शा धी न कालावधीसाठी नियुक्त करण्यात आले. सध्या त्या पंचायत समिती बुलढाणा येथे कार्यरत आहेत, शासकीय सेवेत कार्यरत राहून त्यांनी युपीएससी सारखी सर्वोच्च स्पर्धा परीक्षा यशस्वीरित्या पार केली ही गोष्ट अनेक युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. यांच्या या प्रेरणेने पुसद च्या शिरात मानाचा तुरा रोवला आहे.

 
                                                                                                
							











 
			   
			   
			   
			   
			   
			   
			   
			  
















