मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
सहसंपादक सिद्धार्थ कदम
गरजू व गोरगरिबांना अन्नाचा घास पुरविणाऱ्या,”माणुसकीची भिंत” च्या विविध मानवीय कार्याची दखल घेत,”संत गाडगेबाबा अध्यासन केंद्र, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती “चे संचालक मा.डॉ.दिलीपभाऊ काळे यांनी पुसद येथे येऊन या माणुसकीची भिंतीच्या विविध उपक्रमाची माहिती घेतली ,तसेच उपजिल्हा रुग्णालय पुसद व शनीमंदिर समोरील कपडेवाटप उपक्रमाला भेट दिली. त्यांनी अन्नदान,रुग्णास मदत,घर जळालेल्या परिवारास मदत,गरजवंतां सोबत दिवाळी, गरजवंता समवेत भाऊबीज व रक्षाबंधन, तसेच मेडिकल किट व मातांना मदत या उपक्रमांचे कौतुक केले. “माणुसकीची भिंत”च्या वतीने शहरात विविध उपक्रम राबविण्यात येतात याचे मा डॉ श्री दिलीपभाऊ काळे यांनी कौतुक केले. व माणुसकीच्या भिंतीचे मानवी काम वाढवण्या करीता मदत करण्याचे आव्हान केलेयावेळी मा डॉ दिलीपभाऊ काळे,गुलामनबी आझाद समाजकार्य महाविद्यालय पुसदचे प्राचार्य डॉ.भालचंद्र देशमुख सर,संदीपभाऊ चिस्तळकर माणुसकीच्या भिंतीचे अध्यक्ष गजानन जाधव,पंजाबराव ढेकळे,अनंता चतुर,धनंजय आघाम,संतोषराव तुंडलवार,प्रतिभा तुंडलवार,देवानंद तुंडलवार,प्रीतीताई तुंडलवार,सचिन तुंडलवार, धनश्री तुंडलवार,हर्ष,कुमारी भूमी,अनंतराव तगलपल्लेवार,अंजली तगलपल्लेवार,राम पदमवार,साधनाताई पदमवार,आशाताई कन्नावार,संदीप चिस्तळकर दीपक घाडगे व माणुसकीची भिंत शुभचिंतक उपस्थित होते.
