मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
कारला देवस्थान येथे आणून टाकलेले वृद्ध मातोश्री सुशीलाबाई वृद्धाश्रम आर्णी येथे रवानाजे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले… या अभंगा प्रमाणे व संत गाडगे बाबा यांच्या विचाराचा वसा घेऊन पुसद परिसरामध्ये सामाजिक कार्य करणारी, संस्था म्हणजे माणुसकीची भिंत. अन्नदाना सोबतच इतरही सामाजिक कार्य ही संघटना नियमित करीत आहे… समाजात असेही लोक आहेत. तर समाजातील काही लोक माणुसकी पूर्णपणे विसरून जात आहेत. आपल्या वृद्ध आई-वडिलांची म्हातारपणी सेवा करायची सोडून त्यांना कुठेही नेऊन सोडत आहेत. असाच एक प्रकार नुकताच कारला देवस्थान पुसद येथे पाहण्यास मिळाला. ७६ वर्षांचे वृद्ध एक त्यांना पायाने चालता येत नाही अशा अवस्थेत त्यांच्या घरच्यांनी कारला देवस्थान येथे आणून टाकले. देवस्थानच्या सदस्यांनी माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन पुसद ला फोन केला व ही माहिती त्यांना सांगितली. व आपण या वृद्ध व्यक्ती काही मदत करू शकता का अशी विचारना केली. त्यांना प्रतिसाद देत माणुसकीची भिंत सदस्यांनी त्यांना आपण वृद्धाश्रमात पाठवून त्यांच्या वर उपचार करून त्यांची राहण्याची व्यवस्था करून शकतो असे सुचविले.लगेच स्व.मातोश्री सुशीलाबाई मा नागपुरे वृद्धाश्रम आर्णी येथे फोन करून त्यांना सर्व परिस्थिती कळवली. श्री विशाल नागपूरे यांनी पुसद पोलीस स्टेशनला तशी सूचना देऊन आर्णी येथील स्व.मातोश्री सुशीलाबाई मा. नागपुरे वृद्धाश्रम आर्णी येथे घेऊन या असे सुचवले.त्यानंतर रीतसर पुसद पोलीस स्टेशनला कळवून कारला देवस्थान येथील देवस्थानचे कारभारी जयाजी गणपत मंदाडे व सेवेकरी उद्धव नथूजी साखरे,राजेश भानुदास फुलाते,वैभव सुधाकर ढोकणे,विजू काळे,नामदेव भाकरे,ओंमकार भाकरे व माणुसकीची भिंतचे गजानन जाधव,अनंता चतुर,पंजाब ढेकळे,अरुण नागुळकर,सुदर्शन खंदारे यांनी त्या वृद्ध व्यक्तीला देवस्थान येथील नवीन कपडे घालून मातोश्री वृद्धाश्रम आर्णी येथे नेऊन सोडले. यावेळेस माणुसकीची भिंत चे अध्यक्ष गजानन जाधव यांनी स्व. मातोश्री सुशीलाबाई मा नागपुरे वृद्धाश्रम आर्णी येथील असलेल्या वृद्धाश्रमाला जमेल तशी मदत करण्याचे सर्वांना आवाहन केले. त्यांच्या या मानवीय कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे….

 
                                                                                                
							










 
			   
			   
			   
			   
			   
			   
			   
			  














