मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
यवतमाळ जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, शस्त्र बाळगणा-या तसेच अउघड गुन्हे, आरोपी शोध, अवैध धंदे तसेच गुंगीकारक औषधद्रव्याची तस्करी समुळ उच्चाटन व्हावे याकरीता मा. पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता (भा.पो.से) यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिनस्थ पथकांना गोपनिय माहीती काढून प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सुचना दिल्या आहेत.दिनांक 17/01/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथक यवतमाळ कॅम्प पुसद हे उमरखेड व पुसद उपविभागात पेट्रोलींग करीत असतांना सायंकाळी 18/20 वाजता सुमारांस गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली कि, पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण हददीतील मौजे-घोनसरा ते मोहदी रोडने तिन इसम FZ मोटार सायकल क्रमांक MH-29 BX-6906 वरुन गांजा अंमली पदार्थ घेवून येणार आहे. अशी माहीती मिळाल्याने संदर्भात प्राप्त माहिती वरुन पथकाने तात्काळ वरिष्ठांना याबाबत अवगत करुन मौजे घोनसरा गावच्या हददीत घोनसरा गावाच्या अलीकडे अंदाजे 100 मिटर अंतरावर रात्री 21/10 वाजण्याचे सुमारांस सापळा लावला असता घोनसरा बाजूकडून एक मोटार सायकल त्यावर तिन इसम येत असतांना दिसून आल्याने पोलीस कौशल्याचा वापर करुन अतिशय शिताफिने सदर मोटार सायकल रोडच्या बाजूला थांबवली असता एक इसम अंधाराचा फायदा घेवून पळून गेला असून दोन इसम यांस ताब्यात घेवून त्यांना त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव 1) अमरसिंग चतरु जाधव वय 56 वर्ष, रा. आमणी (लहान) ता. महागांव जि. यवतमाळ 2) शंकर देवराव खोकले वय 41 वर्ष, रा. आमणी (लहान) ता. महागांव जि. यवतमाळ यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडील एका पिवळया रंगाच्या प्लॉस्टीक पिशवीची पाहणी केली असता । किलो 170 ग्रॅम गांजा अंमली पदार्थ मिळून आल्याने ते जप्त करुन त्यांचेकडील, एक मोबाईल, FZ मोटार सायकल क्रमांक MH-29 BX-6906 असे एकूण किंमत 1,33,400/- रु चा मुददेमाल जप्तीसह नमूद इसमा विरुध्द अंमली औषधी व मनप्रभावी पदार्थ अधिनियम 1895 चे कलम 8 (c), 20 (b), (B) अन्वये पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण येथे गुन्हा नोंदीसह कार्यवाही करण्यात आली आहे.स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ ही अवैध धंदे, शस्त्र बाळगणा-या, गुन्हे उघड करणे तसेच गुंगीकारक औषधद्रव्याची तस्करी चे उच्चटन करण्यास प्रतिबध्द असुन यापुढे यासंबंधी माहिती असल्यास सदरची माहिती जनतेने पोलीसाची कोणतीही भिती मनात न बाळगता पुरवावी व पोलीसांना सहकार्य करावे ही विनंती.सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. कुमार चिंता (भा.पो.से) सा, मा. अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. अशोक थोरात (म.पो.से) सा तसेच मा. सहा पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. हर्षवर्धन बी जे सा. (भा.पो.से) सा मा.पोलीस निरीक्षक श्री. सतीश चवरे, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, यांचे मार्गदर्शनात सपोनि/धिरज बांडे, पोउपनि शरद लोहकरे, सफौ/मुन्ना आडे, पोहवा/संतोष भोरगे, पोहवा/तेजाव रणखांब, पोहवा सुभाष जाधव, पोहवा/कुणाल मुंडोकार, पोहवा/रमेश राठोड, चापोउपनि रविंद्र शिरामे, चापोशि/राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

























