मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
दिनांक ११/०९/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचेकडील पथक मा. पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता साहेब व पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ पोलीस निरीक्षक सतिश चवरे साहेब यांचे आदेशाने उमरखेड उपविभागामाध्ये पेट्रोलिंग करीत आसताना इसम नामे अनिकेत गजानन कामारकर वय.२१ वर्ष, रा.महागाव ता. महागाव जि. यवतमाळ हा त्याचे ताब्यात विना नंबरची हिरो स्प्लेंडर प्लस मो.सा. घेवून छत्रपती संभाजी महाराज चौक उमरखेड बायपास येथे थांबला आहे अशी मुखबीर कडून खात्रीशीर माहीती प्राप्त झाल्याने, त्या माहीती प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दोन पंचाना सोबत घेवून छत्रपती संभाजी महाराज चौक उमरखेड बायपास येथे गेले असता तेथे मुखबीर ने दिले माहीती प्रमाणे इसम नामे अनिकेत गजानन कामारकर हा त्याचे ताब्यात विना नंबरची हिरो स्प्लेंडर प्लस मो. सा.सह उभा असलेला दिसला त्यावेळी सदर पथकाने त्याचे जवळ जावून त्याचे ताब्यात असलेल्या स्प्लेंडर प्लस मो.सा.बाबत विचारणा करता त्याने सदर बाबात काही एक संयुक्तीक उत्तर दिले नाही त्यावेळी सदर पथकाने सदर मो.सा. चे चॅसीस नंबर व इंजिन नबंरची पंचाचे समक्ष खात्री करता सदर मो.सा.चा. नंबर एम.एच.२९/बी. के.१६०५ असा असुन सदर मो.सा. दिनांक ०७/०८/२०२५ रोजी कलगाव ता. महागाव जि. यवतमाळ येथून चोरीला गेली असल्याचे व त्याबाबत इसम नामे संतोष नारायण राउत वय ५१ वर्ष, रा. कलगाव ता. महागाव जि. यवतमाळ यांनी दिले फिर्यादीवरून महागाव पोलीस स्टेशन अपराध नंबर ५४८/२०२५ कलम ३०३(२) भा.न्या.सं.प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे दिसून आल्याने सदरची मो.सा.ही चोरीची असल्याची स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची खात्री झाल्याने पंचाचे समक्ष पंचनामा करून सदर मो.सा. जप्त करून व आरोपी नामे अनिकेत गजानन कामारकर वय २१ वर्ष, रा. महागाव ता.महागाव जि. यवतमाळ यांस ताब्यात घेवून पुढील कार्यवाही कामी महागाव पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहे.सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. कुमार चिंता (भा.पो.से.) सा, मा.अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. अशोक थोरात सा., मा. पोलीस निरीक्षक श्री. सतिश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचे मार्गदर्शनात सपोनि/धिरज बांडे, पोउपनि/शरद लोहकरे, सहा. फौजदार/मुन्ना आडे, पो.हवा/संतोष भोरगे, कुणाल मुंडोकार, रमेश राठोड, तेजाब रणखांब, सुभाष जाधव, सुनिल पंडागळे, चालक फौजदार रविंद्र श्रीरामे व पोशि/राजेश जाधव सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

 
                                                                                                
							










 
			   
			   
			   
			   
			   
			   
			   
			  














