मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
सहसंपादक सिद्धार्थ कदम
यवतमाळ जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, अवैध शस्त्र (अग्नीशस्त्र) बाळगणा-या तसेच अ उघड गुन्हे, आरोपी शोध तसेच गुंगीकारक औषधद्रव्याची तस्करी समुळ उच्चाटन व्हावे याकरीता मा. पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता (भा.पो.से) यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिनस्थ पथकांना गोपनिय माहीती काढून अ उघड गुन्हे उघड करुन आरोपी शोध घेणे बाबत सुचना दिल्या आहेत.दिनांक 02/04/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथक यवतमाळ कॅम्प पुसद हे अ उघड गुन्हे मधील आरोपी शोध व माहीती काढत असतांना गुप्त बातमीदाराव्दारे माहीती मिळाली कि, दोन संशयीत इसम महागांव हददीतून मोटार सायकल चोरी केली आहे व ती मोटार सायकल विक्री करण्याकरीता महागांव कडून यवतमाळ बाजूकडे येत असल्याबाबत गोपनिय माहीती मिळाल्याने नमूद पथक मौजे खडका फाटा राजमाता जिजाउ उडानपुल येथे सापळा रचला असता दोन संशयीत इसम दोन मोटार सायकल घेवून येत असल्याचे दिसून आल्याने त्याना थांबवून त्याचे ताब्यातील मोटार सायकलची पाहणी केली असता Gold Black Hero Splender ही चोरीची असल्याचे कबूल केल्याने ती महागांव पोलीस स्टेशन अप क्रमांक 138/2025 कलम 303 (2) भान्यास मधील चोरीची असल्याचे खात्री झाल्याने इसम नामे-1) निलेश नामदेव जाधव वय 27 वर्ष, 2) राहूल प्रभाकर बेले वय 30 वर्ष, दोन्ही रा.आमणी (खुर्द) ता. महागांव जि. यवतमाळ यास ताब्यात घेवून गुन्हयातील मोटार सायकल क्रमांक MH-29BM-5974 तसेच शाईन मोटार सायकल क्रमांक MH-29-BA-2717 अशा दोन मोटार सायकल किंमत 1,40,000/- रु जप्त करुन सदर मोटार सायकल व इसम नामे-1) निलेश नामदेव जाधव वय 27 वर्ष, 2) राहूल प्रभाकर बेले वय 30 वर्ष, दोन्ही रा. आमणी (खुर्द) ता.महागांव जि. यवतमाळ यांना पुढील तपास कामी पोलीस स्टेशन महागांव यांच्या ताब्यात दिले.सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. कुमार चिंता सा, मा.अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. पियुष जगताप सा, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. हनुमंत गायकवाड सा, मा. पोलीस निरीक्षक श्री. सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचे मार्गदर्शनात सहा. पोलीस निरीक्षक गजानन गजभारे, पोउपनि/शरद लोहकरे, चापोउपनि/रविंद्र शिरामे, पोहवा/संतोष भोरगे, पोहवा/तेजाब रणखांब, पोहवा/सुभाष जाधव, पोहवा रमेश राठोड, पोहवा/कुणाल मुंडोकार, पोशि/सुनिल पंडागळे, चापोकॉ राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
