मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
.पुसद मध्ये मागील दहा वर्षांपासून पुसद येथील उप जिल्हा रुग्णालया मधील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना विनामूल्य सकाळ व सायंकाळी अन्नदान करणारी संस्था, माणुसकीची भिंत सोशल फॉउंडेशन पुसद, श्री भवानीमाता टेकडीवर मागील तीन वर्षापासून वृक्षारोपण व त्यांचे संरक्षण करणारी ग्रीन मिशन, पुसद मधील गरीब रुग्णाला सदैव मदत करणारी रुग्णमित्र फॉउंडेशन, तसेच प्लास्टिक निर्मूलनामध्ये सतत काम करणारी गीताई केंद्र, या सामाजिक संघटनेच्या वतीने,नुकतीच आपल्या पुष्पावंती नगरीची लेक डॉ. प्रिया अशोक शेजूळे यांची नुकतीच भारतीय अंतराळ शास्त्रज्ञ (ISRO) येथे संशोधन शास्त्रज्ञ निवड झाली. याचा पुषपावंती नगरितील सर्व नागरिकांना सार्थ अभिमान आहे. त्यांचा सत्कार आज दिनांक 13 रोजी सकाळी 10 वाजता विश्रामगृह पुसद येथे वरील संघटने तर्फे सत्कार करण्यात आला. गीताई केंद्राच्या श्रीमती शैलाताई सावंत यांचे हस्ते डॉ. प्रिया शेजूळे यांना शाल व एक वृक्ष देऊन मान सन्मान करण्यात आला. तसेच माणुसकीची भिंत सोशल फॉउंडेशन चे अध्यक्ष यांचे हस्ते मानचिन्ह देऊन बहुमान करण्यात आला.या प्रसंगी मिशन ग्रीनचे रमेश डंबोळे,पवन बोजेवार रुग्णमित्र फाउंडेशनचे शांतीसागर इंगोले माणुसकीच्या भिंतीचे ,अरुण नागुलकर अनंता चतुर धनंजय आगाम वैष्णवी जाधव अमित हटवार व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचलन धनंजय आघाम यांनी केले

 
                                                                                                
							










 
			   
			   
			   
			   
			   
			   
			   
			  

















