मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
घराकडे जात असताना गावाजवळील नाल्यावर आलेल्या पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने दुचाकीसह वाहून गेले. ही घटना सोमवारी रात्री ७च्या सुमारास पुसद तालुक्यातील सिंगरवाडी येथे घडली. घटनास्थळापासून सुमारे सात किलोमीटर अंतरावर पत्नीचा मृतदेह आढळून आले असून, पतीचा मृतदेह तिनं दिवनतर आढळून आलामोहन सकरू राठोड (४७), सुलोचना मोहन राठोड (४२) रा.सिंगरवाडी, अशी वाहून गेलेल्या पती-पत्नीचे नावे आहेत. सिंगरवाडी येथील शेतकरी मोहन सकृ राठोड पत्नी सुलोचना मोहन राठोड सोमवारी सकाळी दुचाकीने शेतात गेले होते. दिवसभर शेतातील कामे आटोपून सायंकाळी गावाकडे परत येत होते. तेवढ्यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यामुळे गावाजवळील नाल्याला पूर आला. पुलावरून पाणी वाहत होते. पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने मोहन राठोड व सुलोचना राठोडनाल्याच्या पुरात वाहून गेले दोघेही वाहून गेले. सकाळी शेतात गेलेले राठोड घरी परत न आल्याने पूर ओसरल्यावर गावकऱि व युवक मंडळ त्यांचा शोध घेतला असता, गावाजवळील पुलाजवळ नाल्यात दुचाकी (क्रमांक एमएच २९- क्यू ६९३०) आढळून आली. त्यावरून मोहन राठोड पत्नी सुलोचना राठोड पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचे गावकऱ्यांच्या लक्षात आले. या घटनास्थळी पुसद तहसीलदार माधवराव जोरावर साहेब तसेच शेळके साहेब मंडळ अधिकारी अग्निशमन दलाने सुध्दा शोध मोहिम राबविली. पुसद ग्रामीण पोलिसांना माहिती देण्यात आली. शोधकार्य सुरू असताना मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घटनास्थळापासून 7 किलोमीटर अंतरावर वनवारला शिवारात सुलोचना राठोड यांचा मृतदेह आढळून आला, तीन दिवसाच्या नंतर मोहन राठोड यांचे मृतदेह आढळले आले वअंत्यसंस्कार तीन वाजता करण्यात आलेरात्रीच्या वेळी थांबल्यास पुराचे पाणी आणखी वाढू शकते, असे वाटल्याने मोहन राठोड यांनी पत्नीसह पुराच्या पाण्यात दुचाकी टाकली आणि घात झाला. पुराचा अंदाज न आल्याने पाण्याच्या प्रवाहात दोघेही दुचाकीसह वाहून गेले.मोहन सकरु राठोड व सुलोचना मोहन राठोड यांच्या मागे दोन मुले व एक मुलगी असा आप्तपरिवार आहे. या दुःखद घटनेप्रसंगी सिंगरवाडी येथील माजी जि. प. सदस्य बाबुसिंग आडे, रामराव चव्हाण, सुदाम राठोड, प्रकाश आडे सरपंच व अनिल चव्हाण पोलिस पाटील यांनी सर्वोतोपरी मदत केली. ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये विनोद तारासिंग राठोड रा. सिंगरवाडी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मर्ग दाखल करण्यात आला.अशी माहिती पुसद ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र राऊत यांनी दिली. या प्रकरणी पुसद ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास ठाणेदार सुरेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनात पोलिस कॉन्स्टेबल नाना मस्के करीत आहे

 
                                                                                                
							










 
			   
			   
			   
			   
			   
			   
			   
			   
			  
















