मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
राज्य सेवा समन्वयक श्री छगन जाधव साहेब यांच्या प्रमुख उपस्तिथित दारव्हा समिती प्रमुख श्री प्रमोद चौधरी टीम तफ्रे दिनांक 30 ऑगस्ट 2025 रोजी ग्राम वाध्रांबरी महालक्ष्मी संस्थान देऊळगाव वळसा ता.दारव्हा येथे महालक्ष्मी मंदिर ते टेक डी मंदीर परिसरात साई भक्तांचे हस्ते 101 झाडांची वृक्षारोपण करण्यात आले

त्यात आंबा, वड, सिताफळ,पिंपळ, आवळा अशाप्रकारचे 101 झाडे श्री छगन जाधव साहेब, प्रमोद चौधरी, कैलास राठोड, विजय शर्मा, डॉ श्रावण जाधव, डॉ काळे, सुचेता तिवारी, रेखा शेबे, हेमा तगलपलेवार, अरुणा शिरसाठ, कुसुम राठोड, संस्थान चे अध्यक्ष श्री नाना राऊत यांच्या हस्ते वॄक्षारोपण पार पडले 101 झाडांची रोपे वनपरिक्षेञ अधिकारी दारव्हा यांचे कडून सत्यसाई समिती ला निशुल्क देण्यात आली वृक्षारोपणानंतर भगवान सत्यसाई बाबांचया प्रेरणेतून रूग्ण सेवा हीच ईश्वर सेवा हे उद्देश्य बाळगून मोफत वैद्यकीय सेवा ग्राम पंचायत देऊळगाव वळसा येथे घेण्यात आले शिबिरात 115 रुग्ण तपासणी करूण मोफत औषधी वाटप करण्यात आले व भगवान् बाबांची आरती करून शिबिरांची सांगता करण्यात आलीयावेळी गावातील महीला पुरुष व गावकरी मंडळी उपस्थित होते


 
                                                                                                
							










 
			   
			   
			   
			   
			   
			   
			   
			   
			   
			  















