मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
सहसंपादक सिद्धार्थ कदम
सम्राट अशोक, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञापर्व समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून काल दिनांक 7 एप्रिल 2025 रोजी किरण माने प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.सर्व प्रथम प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून धम्मनायक सम्राट अशोक,छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. प्रज्ञापर्व 2025 कार्यक्रमाचे उद्घाटन पूजनीय भंते तसेच प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी संघमित्रा महिला मंडळ कवडीपूर, व सुजाता महिला मंडळ ग्रीन पार्क महिला मंडळाच्या वतीने बुद्ध वंदना घेण्यात आली. तसेच बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या छोट्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीतातून आंबेडकरी नृत्य गीत सादर केले. *यावेळी प्रथम अध्यक्ष स्थानावरून बोलताना बाळासाहेब कामारकर यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले* शिवराय ते भिमराय या विषयावर बोलताना किरण माने म्हणाले कीआपण छत्रपती शिवराय आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई ते नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळ असा प्रवास झाला आहे,महापुरुषांचा इतिहास आजच्या परिस्थितीशी तंतोतंत जुळतो कारण शिवरायांसाठी सामान्य नागरिक प्राणाची बाजी लावून लढत होते त्याचे कारण शिवरायांनी रयतेचे राज्य निर्माण केले, तेच काम भिमरायाने अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महापुरुषाच्या विचाराने प्रेरणेतून सविधान रुपी संविधान लिहून दलित वंचित बहुजन श्रमिकांना अधिकार देऊन न्याय देण्याचे काम केले. यावेळी प्रमुख पाहुणे यांचा प्रज्ञापर्व समितीच्या वतीने ट्रॉफी शिल्ड पुस्तक गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाला, पूजनीय भंतेजी, प्रमुख वक्ते, सिने अभिनेते किरण माने, या कार्यक्रमाचे अध्यक्ष क्रांती उर्फ बाळासाहेब कामारकर, प्रज्ञापर्व आंबेडकर जयंती चे संस्थापक अध्यक्ष भीमराव कांबळे,उपकार्यकारी अभियंता अतुलकुमार , कोटांगळे , दै, सकाळचे दिनकर गुल्हाने, मा. पं. स.सदस्य देवेंद्र खडसे, प्रज्ञापर्व समिती २०२५ अध्यक्ष मिलिंद जाधव माणुसकीच्या भिंत फाउंडेशनचे गजानन जाधव इत्यादीची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विजय कांबळे यांनी तर आभार बाबाराव उबाळे यांनी केले. या कार्यक्रमाला महिला, बालक, पुरुष व असंख्य बौद्ध बांधव उपस्थित होते
