मुख्य संपादक सुर्यकांत राठोड. सहसंपादक सिद्धार्थ कदम
या बैठकीत विकास आराखड्यातील आवश्यक बदलांना मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासोबतच राम नवमीच्या पावन दिवशी “बणजारा विरासत” नंगारा म्युझियम पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. तसेच नंगारा म्युझियमचे व्यवस्थापन व देखरेखीचे मूल्यमापन तज्ज्ञांकडून करण्यास मान्यता देण्यात आली. केंद्र व राज्य सरकारच्या अनुदानातून अन्य आवश्यक विकासकामांसाठी निधीचा वापर करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.या निर्णयामुळे श्री क्षेत्र पोहरादेवी तीर्थक्षेत्राचा आध्यात्मिक, सांस्कृतिक वारसा जोपासण्याबरोबरच पर्यटनवाढीस चालना मिळणार आहे.या बैठकीस ग्रामविकास मंत्री मा. ना. जयकुमार गोरे, राज्यमंत्री मा. ना. इंद्रनिल नाईक, राज्यमंत्री मा. ना. माधुरी मिसाळ, राज्यमंत्री मा. ना. योगेश कदम यांच्यासह श्री क्षेत्र पोहरादेवीचे धर्मगुरू श्री. बाबुसिंग महाराज, महंत श्री. कबीरदास महाराज, महंत श्री. सुनील महाराज, महंत श्री. जितेंद्र महाराज, महंत श्री. शेखर महाराज, महंत श्री. यशवंत महाराज आदी मान्यवर उपस्थित होते.
