यवतमाळ जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, अवैध शस्त्र, अवैध उत्खन्न सुरु राहणार नाही तसेच अउघड गुन्हे, आरोपी शोध, अवैध धंदयाचे समुळ उच्चाटन व्हावे याकरीता मा. पोलीस अधीक्षक कुमार चिंथासा यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिस्थान पथकांना गोपनिय माहीती काढून प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सुचना दिल्या आहेत.दिनांक 03/09/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुसद व उमरखेड उपविभागात गणपती मंडळ भेटी व पेट्रोलींग करीत असतांना इसम नामे-अनिल मारोती सोळंखे रा. महागांव यांने काही दिवसापुर्वी वाढदिवसात केक कापण्याकरीता धारधार शस्त्र (तलवार) वापर करुन दहशत निर्माण करण्याकरीता सोशल मिडीयावर स्टेटस ठेवले असल्याबाबत माहीती मिळाली होती. आज तो महागांव बाय पास रोडवर स्वतःच्या ताब्यात एका प्लॉस्टिक पिशवी (पोत्यात) धारधार शस्त्र (तलवार) बाळगून आहे तसेच तो सार्वजनिक ठिकाणी शांतता व सुव्यवस्था भंग करुन दखलपात्र गुन्हा करण्याचे इरादयाने लोंखडी धारधार तलवार बाळगून आहे अशी मुखबीरव्दारे खात्रीशिर माहीती मिळाल्याने पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी दोन पंचासह महागांव छत्रपती संभाजी महाराज चौक महागांव बायपास येथे जावून पाहनी केली असता माहीती प्रमाणे सदर आरोपी हा त्याचे जवळ प्लॉस्टिक पोत्यात एक धारधार पाते असलेली लोखंडी तलवार किंमत रु 2000/- ची स्वतःच्या ताब्यात बाळगुन असतांना मिळून आल्याने ती जप्त करुन ताब्यात घेवून इसम नामे-अनिल मारोती सोळंके वय 27 वर्ष, रा. छत्रपती संभाजी महाराज वार्ड क्रमांक 14 महागांव ता. महागांव जि. यवतमाळ यांच्या विरुध्द पोलीस स्टेशन महागांव येथे कलम 4, 25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा करण्यात आलेला आहे.सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. कुमार चिंता सा, मा. अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. अशोक थोरात सा, मा. पोलीस निरीक्षक श्री. सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचे मार्गदर्शनात सपोनि/धिरज बांडे, पोउपनि/शरद लोहकरे, स. फौ बालाजी ठाकरे, मुन्ना आडे, पोहवा/संतोष भोरगे, पोहवा/तेजाब रणखांब, पोहवा/सुभाष जाधव, पोहवा/कुणाल मुंडोकार, पोहवा रमेश राठोड, पोशि/सुनिल पंडागळे, चा.पो.उप.नि. रविद्र शिरामे, चापोशि/राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.


 
                                                                                                
							










 
			   
			   
			   
			   
			   
			   
			   
			   
			   
			  














