मुख्य संपादक सुर्यकांत राठोड (जनता न्युज 24)
यवतमाळ जिल्हात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, शस्त्र बाळगणा-या तसेच अउघड गुन्हे, आरोपी शोध, अवैध धंदे तसेच गुंगीकारक औषधद्रव्याची तस्करी समुळ उच्चाटन व्हावे याकरीता मा. पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता (भा.पो.से) यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिनस्थ पथकांना गोपनिय माहीती काढून प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सुचना दिल्या आहेत.दिनांक 13/05/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथक यवतमाळ कॅम्प पुसद यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली कि, वाशिम बाजूकडून पुसद बाजूकडे दोन इसम वेगवेगळया मोटार सायकलवर गांजा अंमली पदार्थ विक्री करीता घेवून येत असल्याबाबत गोपनिय माहीती मिळाल्याने संदर्भात प्राप्त माहिती वरुन पथकाने तात्काळ वरिष्ठांना याबाबत अवगत करुन मौजे मांजरजवळा शेतशिवार वाशिम-पुसद रोड येथे सापळा लावून थांबले असता एक काळया रंगाची हिरो मोटार सायकल त्याचे पाठीमागे एक स्कूटी मोटार सायकल वाशिम बाजूकडून पुसद बाजूकडे येत असतांना दिसून आल्याने त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता ते पळून जात असतांना पथकांतील पोलीस अंमलदार यांनी पाठलाग करुन अतिशय शिताफिने ताब्यात घेवून त्यांना त्याचे नाव गाव विचारले असता 1) अब्दूल शकील शेख अब्दूल शफी शेख वय 48 वर्ष, रा. गंगानगर वाशिम बायपास अकोला ता.जि. अकोला 2) अजय भोलाप्रसाद गुप्ता वय 26 वर्ष, रा.देवपेठ वाशिम ता.जि. वाशिम असे असल्याचे सांगितल्याने त्याचे जवळील बॅगेची पंचा समक्ष झडती घेतली असता त्याचे ताब्यातील विक्री करीता असलेला 3 किलो 170 ग्रॅम गांजा, दोन मोबाईल, दोन मोटार सायकल असा किंमत 1,83,400/- रु चा मुददेमाल जप्त करुन त्यावरुन अंमली औषधी व मनप्रभावी पदार्थ अधिनियम 1895 चे कलम 8(c), 15 (ख), 20, 20(b), अन्वये अपराध क्रमांक 180/2025 प्रमाणे पोलीस स्टेशन खंडाळा येथे गुन्हा नोंदीसह कार्यवाही करण्यात आली आहे.स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ ही अवैध धंदे, शस्त्र बाळगणा-या, गुन्हे उघड करणे तसेच गुंगीकारक औषधद्रव्याची तस्करी चे उच्चटन करण्यास प्रतिबध्द असुन यापुढे यासंबंधी माहिती असल्यास सदरची माहिती जनतेने पोलीसाची कोणतीही भिती मनात न बाळगता पुरवावी व पोलीसांना सहकार्य करावे ही विनंती.सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. कुमार चिंता (भा.पो.से) सा, मा.अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. पियुष जगताप (म.पो.से) सा तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी तथा अति पोलीस अधीक्षक श्री. हर्षवर्धन बी जे सा. (भा.पो.से) सा मा. पोलीस निरीक्षक श्री. सतीश चवरे, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, यांचे मार्गदर्शनात सपोनि/गजानन गजभारे, पोउपनि शरद लोहकरे, पोहवा/संतोष भोरगे, पोहवा तेजाब रणखांब, पोहवा सुभाष जाधव, पोहवा/कुणाल मुंडोकार, पोहवा/रमेश राठोड, पोशि/सुनिल पंडागळे, चापोउपनि रविंद्र श्रीरामे, चापोशि/राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
