मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
सहसंपादक सिद्धार्थ कदम
पुसद. दिनांक ०१/०५/२०२५ रोजी पोहवा/११५१ अभिजीत सांगळे, RCP पथक क.०१ पुसद यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली की, दिग्रस कडून काळी दौलत कडे दोन इसम एका मोटरसायकलवर गांजा विकी करीता रात्री उशीरा येणार आहे. अशा गोपनीय माहितीची खात्री करणे करीता आम्ही, प्रभारी अधिकारी पो.स्टे. पुसद ग्रामीण सपोनि /सुरेंद्र राउत यांना व आमचे अधिनस्त पथकाला दिग्रस ते काळी दौलत रस्त्याने सापळा कार्यवाही करणे करीता पाठविले होते.तेव्हा रात्रीचे दरम्यान वनोली गावाचे फाटया समोर छोटया पुलाजवळ दिग्रस कडुन एक मोटरसायकल काळी दौलत कडे येतांना दिसली त्यावरून मोटरसायकल चालकास थांबण्याचा इशारा केला असता, मोटर सायकल चालक हा मोटर सायकल थांबवून अंधाराचा फायदा घेउन पळुन गेला व मोटरसायकलचे मागील सिटवर बसून असलेला इसम हा सापडला . त्यास त्याचे नांव गाव विचारले असता त्यांने त्याचे नाव संतोष गुलाब जाधव, वय ५० वर्षे, रा. चिचपात्र, ता. दिग्रस, जि. यवतमाळ, असे सांगितले व त्याचे जवळील नायलॉन पोत्याची पाहणी केली असता, त्यामध्ये प्रतिबंधित गांजा सदृष्य वनस्पती असल्याचे निदर्शनास आले. तसेच त्यास पळुन गेलेल्या इसमाचे नाव गाव पत्ता विचारला असता, त्याने त्याचे नाव बळीराम वसराम राठोड, वय अं. ३७ वर्षे, रा. सातघरी, ता. महागाव, जि. यवतमाळ असे सांगितले. सदर गांजा सदृष्य मुद्येमाल हा एकुण १७ किलो ३०० ग्रॅम प्रति किलो २५,०००/- रूपये प्रमाणे ४,३२,५००/- रू.चा व जुनी वापरती हिरो होंडा कंपनीची मोटर सायकल क. MH-29-AA-4229 ही ३०,०००/- रू.ची ओप्पो कंपनीचा मोबाईल किं.अं. ५,०००/- रू.चा असा एकुण ४,६७,५००/-रू.चा मुद्येमाल जप्त करण्यात आला.सदर प्रकरणी पो.स्टे. पुसद ग्रामीण येथे NDPS Act प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात येउन आरोपी क (१) संतोष गुलाब जाधव, वय ५० वर्षे, रा. चिचपात्र, ता. दिग्रस, जि. यवतमाळ यास अटक करण्यात आली आहे. तसेच अंधाराचा फायदा घेउन पळून गेलेला आरोपी नामे बळीराम वसराम राठोड, वय अं. ३७ वर्षे, रा. सातघरी, ता. महागाव, जि. यवतमाळ याच्या अटकेकरीता स्वतंत्र पथक नेमण्यात आले आहे. हे विशेष..!सदर गांजा रेड कारवाई श्री. कुमार चिंता, मा. पोलीस अधीक्षक, यवतमाळ, श्री. पियुष जगताप, मा.अपर पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांचे मार्गदर्शनानुसार आमचे आदेशान्वये सपोनि /सुरेंद्र राउत, प्रभारी अधिकारी पो.स्टे. पुसद ग्रामीण, पोउपनि / राहुल देशमुख, पोहवा/रविंद्र गावंडे, पोहवा/चंदन जाधव, पोअं/योगेश आळणे सर्व पो.स्टे. पुसद ग्रामीण तसेच आमचे अधिनस्त RCP पथक क.०१ पुसद मधील पोहवा/अभिजीत सांगळे, पोहवा/गजानन चव्हाण, पोअं/ नरेश नरवाडे, पोअं/पराग गिरनाळे, पोअं/सौरभलोखंडे, पोअं/सुनिल चिरमाडे, पोअं/इरफान अगवान, पोअं/मुरली पांडुळे यांनी केली आहे.अशाप्रकारे कुणीही इसम अवैद्यरित्या गांजा किंवा इतर मादक पदार्थ विकी, वाहतूक किंवा स्वतः चे घरी गोडावुन सदृष्य स्थितीत ठेवत असल्यास नागरीकांनी निर्भय होउन उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पुसद येथे माहिती कळवावी. माहिती कळविणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे याद्वारे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.
